शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

प्रदूषण पसरविणा-या कारखान्यांविरोधात एल्गार, प्रदूषण न थांबविल्यास अधिका-यांवर कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 02:48 IST

नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमधील कारखाने विष ओकत आहेत. रसायनमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते नाल्यात सोडण्यात येत आहे.

नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमधील कारखाने विष ओकत आहेत. रसायनमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते नाल्यात सोडण्यात येत आहे. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून विविध गंभीर आजार होत आहेत. ४ डिसेंबरपर्यंत प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा, अन्यथा आम्ही प्रदूषण पसरविणाºयांचा अहवाल तयार करून त्यांना पाठिशी घालणाºयांवर कारवाई करण्यास शासनाला भाग पाडू, असा इशारा राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार संदीप नाईक यांनी दिला आहे.नवी मुंबईमध्ये प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपन्यांमधील रसायनमिश्रित पाण्यावर १०० टक्के प्रक्रिया केली जात नाही. एमआयडीसीमध्ये जवळपास ५० एमएलडीपेक्षा जास्त पाणी कारखान्यांमधून निघत आहे. परंतु फक्त २५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करता येईल एवढ्याच क्षमतेचे मलप्रक्रिया केंद्र उपलब्ध आहे. तुर्भे व शिरवणे परिसरातील रासायनिक पाणी तुर्भेमधील साठवण टाकीमध्ये साठवून ते पंपिंग करून पावणेमध्ये आणले जाते. ही सर्व प्रक्रिया योग्यपद्धतीने होत नसून दूषित पाणी नाल्यात सोडले जात आहे. यामुळे महापे, पावणे, कोपरखैरणे, तुर्भे, जुईनगर व इतर ठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरू लागली आहे. नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार संदीप नाईक यांनी मंगळवारी पाहणी दौºयाचे आयोजन केले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांना धारेवर धरले. औद्योगिक वसाहतीमध्ये ३५०० पेक्षा जास्त कारखाने आहेत. यामधील किती कारखाने प्रदूषण करत आहेत. जास्त प्रदूषण करणारे कारखाने कोणते, कमी प्रदूषण करणारे कोणते याविषयी कोणताही अहवाल प्रशासनाकडे नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. आरोग्य समिती सभापती दिव्या गायकवाड यांनी प्रदूषण पसरविणाºया कंपन्यांची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली होती. परंतु त्यामधील एकच कंपनी प्रदूषण करत असल्याचा अहवाल संबंधितांनी दिला. यामुळे एमपीसीबीचे अधिकारी व कर्मचारीच प्रदूषणाला खतपाणी घालत असल्याचा आरोप करण्यात आला.प्रदूषणामुळे नवी मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होवू लागला आहे. क्षयरूग्णांची संख्या वाढली आहे. घशाचे आजार व कॅन्सरच्या रूग्णांमध्येही वाढ होत आहे. मागील तीन वर्षात नवीन केमिकल कंपन्याही सुरू करण्यात आल्या असल्याने हे प्रकार होत आहेत. शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून आम्ही तो होवू देणार नाही. ४ डिसेंबरपर्यंत प्रदूषण पसरविणाºया कंपन्यांची यादी तयार करण्यात यावी. संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही स्वत: प्रदूषणाचे नमुने घेवून शासनाकडे तक्रारी करून व अधिकाºयांवरही कारवाईची मागणी करू असा इशारा नाईक यांनी दिला. यावेळी नगरसेवक मुनावर पटेल, मनीषा भोईर, चंद्रकांत पाटील, वैभव गायकवाड, शशिकांत भोईर, एपीसीबीचे तानाजी यादव, केतन पाटील, उदय यादव, उमेश जाधव उपस्थित होते.>कारखान्यांमुळे नवी मुंबईतील प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. श्वसनाचे व इतर गंभीर आजार होवू लागले आहेत. शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळणाºयांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. कारवाईसाठी प्रशासनाला ४ डिसेंबरची डेडलाइन दिली असून प्रदूषण करणाºयांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवरच कारवाई केली जाईल.- संदीप नाईक,आमदार, राष्ट्रवादी काँगे्रस>एमआयडीसीतील अनेक कारखाने प्रदूषण वाढवत आहेत. अशा कारखान्यांची यादी आम्ही एमपीसीबीला दिली आहे. परंतु संंबंधित प्रशासनाने काहीही कारवाई केली नसल्यामुळे पाहणी दौरा आयोजित केला. प्रशासनाने कारवाई केली नाही तर वेळ पडल्यास आंदोलन केले जाईल.- दिव्या गायकवाड,सभापतीआरोग्य समिती