शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील विद्युत, डिझेल दाहिन्या धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 04:39 IST

स्मार्ट सिटीत जनजागृतीचा अभाव; महापालिकेची उदासीनता; फक्त लाकडांचा पर्याय उपलब्ध

- योगेश पिंगळे नवी मुंबई : एकविसाव्या शतकातील सुनियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात अंत्यविधी करण्यासाठी फक्त लाकडांचा पर्याय उपलब्ध असल्याने शहरात प्रदूषणाबरोबर पर्यावरणाची देखील हानी होत आहे. शहरात पालिकेच्या आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून लाखो रु पये खर्च करून करावे, तुर्भे आणि नेरु ळ या भागात विद्युत, डिझेल, गॅसदाहिनी सुरू करण्यात आल्या होत्या; परंतु नागरिकांमध्ये जनजागृती न झाल्याने त्यांचा वापर झाला नाही आणि काही काळातच पर्यावरणपूरक अत्याधुनिक दाहिन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक अंत्यविधी करण्याची इच्छा असूनही नागरिकांना शहरात अन्य पर्याय उपलब्ध नाही.शहरामध्ये तुर्भे येथे डिझेल, नेरु ळ येथे गॅस, तर करावे येथे पर्यावरणपूरक विद्युतदाहिनीची निर्मिती करण्यात आली होती, यामध्ये महापालिकेच्या आणि खासगी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून खर्च करण्यात आला होता; परंतु या दाहिनींची पालिकेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती झाली नाही, तसेच त्याचे महत्त्वदेखील पटवून देण्यात आले नाही, त्यामुळे या पर्यावरणपूरक दाहिनी वापराविना कालांतराने बंद पडल्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करण्यासाठी आजही फक्त पारंपरिक पद्धतीने लाकडांचा पर्याय उपलब्ध आहे. अंत्यविधीसाठी १०० टक्के लाकडांचा वापर होत असल्याने, तसेच पर्यावरणपूरक अंत्यविधी करण्याची इच्छा असूनही पर्याय उपलब्ध नसल्याने नागरिकांना पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करावे लागत आहेत. नवी मुंबई शहरात राहणाºया नागरिकांचा पालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यविधी करावयाचा असल्यास पालिकेच्या माध्यमातून अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड, मीठ, गोवºया, रॉकेल आदी साहित्य पुरविण्यात येते. पारंपरिक पद्धतीने लाकडाचा वापर करून अंत्यविधी करण्याची नागरिकांची मानसिकता असली तरी शहरांमध्ये राहणाºया नागरिकांमध्ये काळानुरूप झालेल्या विचारांच्या बदलानुसार प्रदूषण विरहित अंत्यविधी करण्याची मानसिकता येत चालली आहे; परंतु २१ व्या शतकातील स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबईचा डंका पिटणाºया सुनियोजित शहरात अंत्यविधीसाठी अत्याधुनिक यंत्रणेचा पर्याय उपलब्ध नसल्याने, मानसिकता असूनदेखील पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करावा लागत आहे. शहरात राहणारे पर्यावरणप्रेमी नागरिकांना पर्यावरणपूरक अंत्यविधी करण्यासाठी मुंबई सारख्या शहरात जावे लागत आहे. गेल्या सहा महिन्यांच्या आकडेवारीनुसार शहरात महिन्याला सरासरी ३०० नागरिकांचा अंत्यविधी पालिकेच्या विविध स्मशानभूमींमध्ये केला जातो. यासाठी दीड हजार टन लाकूड जाळण्यात येत आहे. तसेच यासाठी महिन्याला सरासरी दहा लाख रु पयांहून अधिक खर्च केला जात आहे. महापालिकेने शहरातील मध्यवर्ती स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी अत्याधुनिक यंत्रणा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.करावेमधील विद्युतदाहिनी पुन्हा सुरू होणारनागरिकांना अंत्यविधीसाठी पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महापालिकेच्या करावे येथील बंद पडलेली विद्युतदाहिनी वाहिनी नवी मुंबई चॅरिटेबल फाउंडेशन ही संस्था पुन्हा सुरू करणार आहे. तसेच या संस्थेच्या माध्यमातून एक वर्षे या विद्युतदाहिनीची देखभाल दुरुस्तीही केली जाणार आहे.नवी मुंबई शहरात नागरिकांना विविध सुविधा देण्याच्या दृष्टीने पालिकेच्या माध्यमातून विविध अत्याधुनिक उपक्र म राबविले आहेत.काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ या उपक्रमात कचºयाचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावणाºया नवी मुंबई शहराला घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात देशात सर्वोत्तम शहर म्हणून नामांकन प्राप्त झाले आहे.शहराचे नावलौकिक वाढविण्यासाठी शहरात अनेक उपक्र म राबविणाºया महापालिकेने पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी, तसेच वृक्षसंवर्धनासाठी पर्यावरणपूरक दाहिनी बांधल्या होत्या.पालिकेच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी पर्यावरणपूरक यंत्रणा बसविण्यात आल्या होत्या; परंतु या यंत्रणा सुरू राहण्यासाठी आवश्यक तसा प्रतिसाद मिळाला नसल्याने त्या बंद पडल्या आहेत. नागरिकांची काही प्रमाणात मागणी असल्याने येत्या काही महिन्यांत सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शहरातील मध्यवर्ती स्मशानभूमीमध्ये गॅसदाहिनी सुरू करण्यात येणार आहेत.- मोहन डगावकर,शहर अभियंता

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई