वैभव गायकर
पनवेल : पनवेल, नवी मुंबईमधील २००पेक्षा जास्त सोसायट्यांवर नियमबाह्य प्रशासक राजवट असल्याप्रकरणी सविस्तर वृत्तमालिका लोकमतने १०, ११, १२ आणि १२ फेब्रुवारी रोजी प्रकाशित केली. या वृत्तमालिकेमुळे सहनिबंधक, सहकारी संस्था, सिडको यांच्या कार्यालयांना जाग आली असून, १ वर्षांपेक्षा जास्त काळ प्रशासक कार्यरत आहेत, अशा ठिकाणी लवकरच निवडणुका घेतल्या जातील, अशी माहिती उपनिबंधक प्रताप पाटील यांनी शुक्रवारी लोकमतला दिली. याबाबत १६ फेब्रुवारीला लेखी आदेश काढले जातील.
एक प्रशासक तीनपेक्षा जास्त सोसायट्यांचे काम पाहू शकत नाही, असे असताना नवी मुंबईत मात्र प्रशासकांनी बाजार मांडला आहे. एक नव्हे तर तब्बल २२ सोसायट्या एकटा प्रशासक सांभाळत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.
मुदत संपलेल्या सोसायट्यांची आम्ही माहिती घेत आहोत. त्या ठिकाणी लवकरच निवडणुका घेतल्या जातील. सोमवारी यासंदर्भात आदेश काढण्यात येतील.प्रताप पाटील उपनिबंधक, सहकारी संस्था, नवी मुंबई
सहनिबंधकांचे उपनिबंधकांना पत्र सहकारी संस्था नवी मुंबई कार्यालयाचे सह निबंधक राजेंद्र वीर यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते व तक्रारदार सुभाष बसवेकर यांच्या लेखी तक्रारीची दखल घेत ज्या उपनिबंधकांनी प्रशासकाच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यांनाच या प्रकरणाची चौकशीच्या सुचना दिल्या आहेत. यामुळे घोटाळ्याची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून सह निबंधक आणि उपनिबंधकांनाच चौकशीच्या कक्षेत आणण्याची गरज आहे.
Web Summary : Lokmat's report on irregular administrator rule in societies prompted action. Elections will be held soon where administrators served over a year. An inquiry is ordered.
Web Summary : सोसायटियों में अनियमित प्रशासक शासन पर लोकमत की रिपोर्ट के बाद कार्रवाई हुई। जहां प्रशासकों ने एक साल से अधिक सेवा की, वहां जल्द ही चुनाव होंगे। जांच का आदेश दिया गया है।