शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल प्रभाग समिती सभापतींची निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 02:44 IST

पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. १० मे रोजी आयुक्तांच्या दालनात प्रभाग समितीच्या बैठकीत निवडणूक होऊन नव्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे.

पनवेल : पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. १० मे रोजी आयुक्तांच्या दालनात प्रभाग समितीच्या बैठकीत निवडणूक होऊन नव्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे. ८ मे रोजी सभापतीपदासाठी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे विद्यमान चार सभापतींना सभापतीपदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा नेमण्यात आलेल्या प्रभाग समित्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून नव्या सभापतींची निवड करण्यासाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. पनवेल महापालिकेच्या नगरसचिवांनी निवडणूक जाहीर केली आहे. मात्र काही वेळा आचारसंहितेचा फटका तर कार्यालय उपलब्ध नसल्याने बैठकाही घेता न आल्याने सभापतींना आपल्या पदाला न्याय देता आलेला नाही. या सर्व घडामोडीत कार्यकाळ संपुष्टात आल्याने सभापतीमध्ये नाराजी आहे. पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर महापालिका क्षेत्रात ४ प्रभाग समित्या स्थापन करण्यात आल्या. अ, ब, क, ड अशा चार समित्यांचे सभापतीपद आपल्याकडे घेण्यासाठी सत्ताधारी भाजपमध्ये चुरस होती. चारही सभापतीपद आपल्याकडे राहतील या दृष्टीने भाजपने प्रभाग समित्यांची रचना केली होती.या विरोधात शेकापने न्यायालयात धाव घेतली आहे. वर्षभरापासून यासंदर्भात न्यायालयात खटला सुरू आहे. सध्याच्या घडीला अ प्रभागाचे सभापती अभिमन्यू पाटील, ब प्रभागाचे एकनाथ गायकवाड, क दिलीप पाटील आणि ड प्रभागाचे चंद्रकांत पाटील असे सभापती आहे. या सर्वांना पायउतार व्हावे लागते की पुन्हा या पदावर काम करण्याची संधी मिळेत, हे येत्या पाच दिवसांत ठरणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता, पक्षांतर्गत नाराज नगरसेवकांना सभापतीपद देऊन त्यांची नाराजी दूर केली जाणार असल्याची चर्चा सध्या पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :panvelपनवेलElectionनिवडणूक