शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई पोलिसांची मतदान केंद्राबाबतची 'आयडिया' निवडणूक आयोगाने स्वीकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 13:20 IST

नवी मुंबई पोलिसांनी काय केला होता प्रयोग? जाणून घ्या

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतरापर्यंत मोबाइल  नेताच येणार नाही हा नियम बदलून आता मतदान केंद्रापर्यंत मोबाइल नेता येणार आहे, पण केंद्राच्या दरवाजावर लटकविलेल्या मोबाइल लॉकरमध्ये तो ठेवावा लागणार आहे. नवी मुंबईपोलिस आयुक्त कार्यालयाने विधानसभा निवडणुकीत वापरलेली ही आयडिया आता केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वीकारली आहे.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, या मोबाइल लॉकर सुविधेला  केंद्रीय निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखविला आहे.  मात्र त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. हे लॉकर सर्वच केंद्रांवर वापरणे आयोगाला अपेक्षित असले तरी सुरक्षेच्या कारणावरून त्यास नकार देण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकेल.  

नवी मुंबई पोलिसांनी काय केला होता प्रयोग?

  • विधानसभा निवडणुकीच्या काळात नवी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाने मतदान केंद्रावर मोबाइल ठेवण्यासाठी एक लॉकर सुविधेचा प्रयोग केला होता. ज्यात जवळपास एकाच वेळी सहा ते सात मोबाइल ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
  • प्रत्येक रकान्यात संबंधित लॉकरची चावी ठेवण्यात आली होती. मतदारांनी या लॉकरमध्ये मोबाइल ठेवून त्याची चावी स्वत:जवळच ठेवण्याची मुभा होती. याचे एक प्रात्यक्षिक आयोगाकडे पाठविले होते. ज्याला आयोगाने सहमती दिली. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वात ही संकल्पना राबविली गेली होती.

मतदार ओळखपत्र मिळण्याचा अवधी कमी

  • मतदारांना नव्याने मतदान ओळखपत्र मिळण्यासाठी जवळपास ४० ते ४५ दिवसांचा कालावधी लागत होता. या संपूर्ण प्रक्रियेत बदल करून आमच्या कार्यालयाने नवे ओळखपत्र अवघ्या १५ दिवसांत उपलब्ध करून देण्यासाठी नवी प्रक्रिया उभी केली असून, त्यालाही आयोगाने मंजुरी दिली आहे. 
  • याबरोबरच मतदारांना आयोगाकडून देण्यात येणाऱ्या मतदानाच्या माहितीबद्दलच्या स्लीपमध्ये आता बदल केला जाणार आहे. यात आता एक नवा रकाना सामील केला जाणार असून, त्यात संबंधित मतदारांचा भाग क्रमांक आणि यादी क्रमांक ठळक अक्षरात नमूद करण्यात येणार आहे.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसElectionनिवडणूक 2024Votingमतदान