शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

ईदनिमित्त अपूर्व उत्साह

By admin | Updated: June 27, 2017 03:15 IST

रमजान ईद ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे, मुंब्रा, कल्याण, भिवंडी, काशिमीरासह

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे: रमजान ईद ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे, मुंब्रा, कल्याण, भिवंडी, काशिमीरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मशिदींमध्ये ईदनिमित्त खास नमाज अदा करण्यात आली आणि अलिंगनासह परस्परांना शुभेच्छा देत ‘ईद मुबारक’ चा संदेश देत आनंदाची देवाण-घेवाण करण्यात आली. ईदच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलिसांनीकडेकोट बंदोबस्त ठेवला होता. ठाण्यात राबोडी, महागिरी कोळीवाडा, इंदिरानगर, हाजुरी परिसरातील मशिदींमध्ये सकाळीच नमाज अदा करून शांतता आणि स्थैर्यासाठी प्रार्थना करत ईदच्या शुभेच्छा दिल्या. नवीन कपडे घालून सजलेल्या बच्चे कंपनीचा उत्साह विलक्षण होता. ईदनिमित्त देण्यासाठी बेटवस्तू, कपडे, दागिने, चपला, सुकामेवा, चॉकलेट, अत्तर यांच्या खरेदीसाठी बाजारपेठांत दिवसभर गर्दी होती. पोलीस आणि अन्य धर्मीयांनी गुलाबाचे फूल आणि मिठाई भेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर मुस्लिमांकडून त्यांना शिरकुर्मा देत त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. सोशल मीडियातही रविवारी रात्री चाँद दिसल्यापासूनच ईदच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. ईदनिमित्त गरीबांना होणारे कपडे आणि अन्नधान्य वाटपाचे कार्यक्रम, शैक्षणिक मदत यांचेही उपक्रम ठिकठिकाणी हाती घेण्यात आले होते. भिवंडीतही जोरदार खरेदीभिवंडी : महिनाभराच्या रोजानंतर विशेष नमाज अदा करून भिवंडीतही उत्साहात ईद साजरी झाली. ईदच्या खरेदीनिमित्ताने इतकी गर्दी झाली, की जुनी एसटी ते तीनबत्ती नाका रस्ता बंद झाला होता. रात्री पडणाऱ्या रिमझिम पावसाची तमा न बाळगता शहरातील विविध भागात उशिरापर्यंत महिला-पुरूषांनी विविध वस्तु व कपड्यांची खरेदी केली. सोमवारी मात्र पावसामुळे मोठ्या मशिदींत टप्प्याटप्प्यात दोनदा नमाज पठण झाले. अहले हदीस मजलक यांना मानणाऱ्या मशिदींत महिलांना नमाज अदा करण्यासाठी वेगळी व्यवस्था केली होती. कोटरगेट येथील जामा मशिदीत पोलिसांनी गुलाबाची फुले देत शुभेच्छा दिल्या. दिवसभर सर्वत्र ईदचा उत्साह कायम होता.कल्याण-डोंबिवलीत उत्साहकल्याण : कल्याण-डोंबिवलीतही ईदच्या शुभेच्छा देण्याचा आनंद लुटण्यात आला. कल्याणचा दूधनाका, दुर्गाडी, रेतीबंदर, बाजारपेठ, नेतिवली आदी भागांत १७ मशिदी आहेत. त्यात विशेष नमाज पठण झाले. सगळयात मोठे नमाजपठण दुर्गाडी येथे झाले. यावेळी समाजाचे कार्यकर्ता शरफुद्दीन कर्पे, नगरसेवक काशीफ कानिकी यांनी शुभेच्छा दिल्या. नमाजपठणानंतर देशबांधवांसाठी प्रार्थना करण्यात आली. डोंबिवलीतील हिना मंझिल येथे ईद उत्साहात साजरी करण्यात आली. खंबाळपाडा येथील भोईरवाडी परिसरात बोहरी मुस्लिमांनी नित्यनमाजपठण करून एकमेकांना शुभेच्छा देत सणाचा आनंद घेतला. अनेक मुस्लिम सामाजिक संघटनांतर्फे गोरगरीब वस्तीत शिरकुर्म्याचे वाटप करण्यात आले.मुंब्य्रात प्रचंड गर्दीमुंब्रा : रमजान ईदनिमित्त खरेदीसाठी मुंब्य्रात प्रचंड गर्दी झाली होती. रेल्वे स्थानकासमोरील तसेच कौसा भागातील जामा मशिदीप्रमाणे दारु ल फलाह, फकरु उद्दीनशहा बाबा दर्ग्याजवळील प्रमुख मशिदींसह विविध ठिकाणी ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली. नंतर गळाभेट घेऊन परस्परांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पोलिसांनीही गुलाब पुष्प वाटपाचा कार्यक्रम केला. लहान मुलांना ईदी म्हणून रोख रक्कम देऊन त्याचा आनंद द्विगुणित करण्यात आला. ईदचा चाँद दिसल्यानंतर रविवारी रेल्वे स्थानकाजवळील तसेच गुलाब पार्क मार्केटमध्ये कपडे, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने, अत्तरे आदींच्या खरेदीसाठी पहाटेपर्यंत झुंबड उडाली होती.