शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

इजिप्त, मध्य प्रदेशातील कांद्यामुळे दर स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 01:18 IST

होलसेल मार्केटमध्ये गुरुवारीही ८० ते १३० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १५० रुपयांनीच कांदा विकला जात आहे.

नवी मुंबई : मुंबईमधील कांदाटंचाई दूर करण्यासाठी गुजरात, मध्यप्रदेशसह इजिप्तवरूनही नियमित कांद्याची आवक सुरू आहे; परंतु आवश्यकतेपेक्षा ३०० ते ५०० टन आवक कमी होत असून, त्यामुळे मार्केटमधील तेजी कायम आहे. होलसेल मार्केटमध्ये गुरुवारीही ८० ते १३० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १५० रुपयांनीच कांदा विकला जात आहे.देशातील अनेक राज्यांना व विदेशातील अनेक देशांनाही महाराष्ट्र वर्षभर कांद्याचा पुरवठा करत असतो; परंतु पावसाने पिकांचे नुकसान झाल्यामुळे राज्यातही कांदाटंचाई निर्माण झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये एक महिन्यापासून इजिप्तवरूनही नियमित कांद्याची आवक सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये हुबळीवरून एक महिना आवक सुरू होती. सद्यस्थितीमध्ये पुणे, संगमनेर, नाशिकमधून मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. याशिवाय गुजरात व मध्यप्रदेशमधूनही कांदा विक्रीसाठी येऊ लागला आहे. मुंबईत चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे गुजरात व इंदोरमधील माल विक्रीसाठी येथे पाठविला जात आहे.देशभरातून गुरुवारी ९३८ टन कांदा विक्रीसाठी आला होता. सद्यस्थितीमध्ये १२०० ते १५०० टन कांद्याची आवश्यकता असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. जोपर्यंत आवक सुरळीत होत नाही, तोपर्यंत बाजारभाव जैसे थे राहतील, अशी प्रतिक्रियाही काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.राज्यातील बाजारपेठेमधील गुरुवारचे बाजारभावबाजार समिती भाव (प्रतिकिलो)कोल्हापूर २० ते १३०मुंबई ८० ते १३०सोलापूर ०२ ते २००संगमनेर १० ते १५०पुणे ३० ते १२५चांदवड १५ ते ९५बाजार समितीमधील कांद्याचे दर पुढीलप्रमाणेमहिना दर (प्रतिकिलो)मार्च ०७ ते ०९एप्रिल ०७ ते ०९मे ०८ ते १२जून १२ ते १६जुलै ११ ते १४महिना दर (प्रतिकिलो)आॅगस्ट १७ ते २२सप्टेंबर ३७ ते ४५आॅक्टोबर २८ ते ३४नोव्हेंबर ५० ते ७५डिसेंबर ८५ ते १२०

टॅग्स :onionकांदा