शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

ई-रूपी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, महापालिका प्रशासनाचा निर्णय

By योगेश पिंगळे | Updated: June 22, 2023 11:45 IST

नवी मुंबई शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शाळांच्या प्रशस्त इमारती उभारून मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, सीबीएसई आदी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आहेत.

- योगेश पिंगळे  

नवी मुंबई : आपल्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेशासहित इतर शैक्षणिक साहित्य महापालिका पुरविते. मात्र, यासाठीच्या डीबीटी धोरणाला पालकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने यंदाच्या वर्षांपासून ई-रूपी प्रणाली राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुषंगाने अंमलबजावणीला सुरुवात केली असून, सर्व विद्यार्थ्यांना गणवेश तसेच इतर शैक्षणिक साहित्य लवकरच उपलब्ध होणार आहे.

नवी मुंबई शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शाळांच्या प्रशस्त इमारती उभारून मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, सीबीएसई आदी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आहेत. या शाळांत शिक्षण घेणाऱ्या बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्यदेखील पुरविले जाते.

डीबीटी धोरण राबविण्याचे आदेश शासनाने दिल्यावर शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून पालिकेने त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केली होती. मात्र अल्प प्रतिसाद मिळत असल्याने यंदा ई-रूपी प्रणाली राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा डेटा आणि विभागानुसार पुरवठादार यावर काम सुरू आहे. ई-रूपी प्रणालीमुळे गणवेश तसेच शैक्षणिक साहित्य मिळणे सुलभ होणार असून यासाठी पालकांना कोणताही आगाऊ खर्च करण्याची आवश्यकता नाही. 

अ‍ॅण्ड्राॅइड मोबाइलची आवश्यकता नाही बँकेच्या माध्यमातून पाठविण्यात येणाऱ्या लिंकच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी पालकांकडे अ‍ॅण्ड्राॅइड मोबाइल असणे आवश्यक नाही. सध्या मोबाइल फोनवरदेखील लिंक प्राप्त होणार असून त्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य घेता येणार आहे.

काय आहे ई-रूपी प्रणाली? महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मोबाइल नंबरसह सर्व माहिती अपडेट केली जात आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाइलवर वेगवेगळ्या ३ लिंक पाठविण्यात येणार आहेत. सदर लिंक पालकांनी गणवेश आणि साहित्य पुरवठा करणाऱ्या दुकानदाराला दाखवायच्या असून दुकानदार त्या लिंकमधील क्यूआरकोड स्कॅन करणार आहे. त्या माध्यमातून पैसे प्राप्त होणार असून शैक्षणिक साहित्य उपलब्ध होणार आहे.

डीबीटी प्रणालीमध्ये तंत्राची अडचणी आणि विलंब होत असल्याने पालकदेखील उत्सुक नव्हते. त्यावर तोडगा म्हणून ई-रूपी प्रणाली आणली आहे. यामुळे महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळणे सोपे झाले असून, नक्कीच लवकरच सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई