शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

संपादित जमिनीची सातबाऱ्यावर नोंद

By admin | Updated: May 2, 2016 02:20 IST

नवी मुंबईतील संपूर्ण जमिनीची मालकी सिडकोकडे आहे. या मालकी हक्काला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी संपादित केलेल्या सर्व जमिनीच्या सातबाऱ्यावर सिडकोने आपल्या

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबईनवी मुंबईतील संपूर्ण जमिनीची मालकी सिडकोकडे आहे. या मालकी हक्काला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी संपादित केलेल्या सर्व जमिनीच्या सातबाऱ्यावर सिडकोने आपल्या नावाची नोंद केली आहे. त्यानुसार जवळपास १५ हजार हेक्टर जागेच्या मालकी हक्कावर सिडकोची अधिकृत मोहर लागली आहे.नवी मुंबईची उभारणी करण्यासाठी राज्य शासनाने सिडको महामंडळाची स्थापना केली. त्यानुसार सिडकोने ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यातील ३४३.७ चौरस किलोमीटरचा भूभाग संपादित केला. शासकीय धोरणानुसार सिडकोने मूळ जमीन मालकाला संपादित केलेल्या जमिनीचा मोबदलाही दिला आहे. त्यानुसार संपादित केलेल्या सर्व जमिनीचा मालकी हक्क सिडकोला प्राप्त झाला आहे. असे असले तरी या मालकी हक्काला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी संपादित जमिनीच्या सातबाऱ्यावर सिडकोचे नाव येणे गरजेचे होते. मात्र मागील चाळीस वर्षांत सिडकोकडून या दृष्टीने कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.सिडकोने खासगी शेतीच्या १५ हजार हेक्टरसह वन आणि शासकीय मालकीच्या जमिनी संपादित केल्या आहेत. वन आणि शासकीय जमिनीच्या सातबाऱ्यांवर सिडकोचे नाव पडले आहे. परंतु शेतकऱ्यांकडून संपादित केलेल्या जागेच्या सातबाऱ्यांवर मात्र आतापर्यंत मूळ मालकाचेच नाव होते. या पार्श्वभूमीवर संपादित केलेल्या जवळपास १५ हजार हेक्टर जागेच्या सातबाऱ्यावर सिडकोचे नाव टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दोन वर्षांपूर्वी सिडकोने घेतला होता. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी यासंदर्भात आग्रही भूमिका घेतली होती. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली होती. सध्या हे काम पूर्ण झाले असून तब्बल १५ हजार हेक्टर जागेच्या सातबाऱ्यावर आता सिडकोचे नाव कोरले गेले आहे. विशेष म्हणजे या मोहिमेसाठी सिडकोने संपादित जमिनीची ताबा पावती, जुने सातबारा त्याचे फेरफार आदी महत्त्वाच्या हजारो कागदपत्रांचे स्कॅनिंग केले. तसेच संपूर्ण जमिनीचे नकाशे अपडेट करण्यात आल्याची माहिती सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी ‘लोकमत’ला दिली.जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या दस्ताऐवजावरून संपादीत व असंपादीत जमिनीचे वर्गिकरण करण्यात आले आहे. त्यावरून सिडकोकडे आणखी मोठ्या प्रमाणात जमीन शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या जमिनीचे योग्य पध्दतीने नियोजन व्हावे, या दृष्टीने लॅण्ड बँकेची निर्मिती करण्यात आल्याचे व्ही.राधा यांनी सांगितले.विमानतळाची जमीनही सातबाऱ्यावरएकूणच २ हजार ६८ हेक्टर जमिनीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारला जाणार आहे. यापैकी जवळपास ९४ टक्के जमीन सिडकोच्या ताब्यात आहे, तर उर्वरित ६ टक्के म्हणजेच ७६१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या संपादित जमिनीचा सातबाराही सिडकोने आपल्या नावावर करून घेतला आहे. तसेच विमानतळबाधितांसाठी प्रस्तावित पुष्पकनगरमध्ये वाटप करण्यात आलेली जमिनीची नोंदही सातबाऱ्यावर करण्यात आली आहे. साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वाटप होणारी जमीनसुध्दा सातबाऱ्यावर घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.