शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात अडीच कोटींचा मुद्देमाल हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 23:40 IST

पोलिसांनी गतवर्षात अनेक गुन्ह्यांचा छडा लावून त्यामध्ये चोरीला गेलेला ऐवज परत मिळवला आहे.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : पोलिसांनी गतवर्षात अनेक गुन्ह्यांचा छडा लावून त्यामध्ये चोरीला गेलेला ऐवज परत मिळवला आहे. त्यापैकी ८३ गुन्ह्यांतील सुमारे अडीच कोटींचा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संबंधितांना परत केला जाणार आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याची उकल करण्यापेक्षा त्यामध्ये गेलेला ऐवज परत मिळवण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे असते. चोरी अथवा घरफोडी किंवा इतर गुन्ह्याच्या मार्गाने मिळवलेला ऐवजाची गुन्हेगाराकडून विल्हेवाट लावली जाते. तर रोख रकमेची चोरी झाल्यास तो पैसाही खर्च केला जातो किंवा इतर गोष्टीत त्याची गुंतवणूक केली जाते, त्यामुळे अशा गुन्ह्याच्या तपासात गुन्हेगार हाती लागल्यानंतरही त्याने चोरलेल्या ऐवजाची वसुली कशी करायची? असा प्रश्न पोलिसांपुढेअसतो. तर अनेकदा सराईत गुन्हेगार पकडल्यानंतरही ते गुन्ह्यातील ऐवज लपवल्याचे ठिकाण पोलिसांना सांगण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे बहुतांश गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार पकडल्यानंतरही त्यामधील चोरीचा ऐवज परत मिळत नाही. अथवा चोरीला गेल्याच्या तुलनेत जप्त झालेला ऐवज अत्यंत कमी असतो. त्यामुळे तक्रारदारांकडून पोलिसांप्रति काहीशी नाराजीही व्यक्त केली जाते. यानंतरही पोलिसांकडून घडलेल्या गुन्ह्यांचा सखोल तपास करून तक्रारदारांचा चोरीला गेलेला ऐवज परत मिळवून देण्याचा प्रयत्न असतो, त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी गतवर्षात घडलेल्या गुन्ह्यांपैकी बहुतांश गुन्ह्यांची उकल केली आहे. त्यापैकी ८३ गुन्ह्यांमधील दोन कोटी ५० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.गुन्हे शाखा पोलीस, परिमंडळ-एक तसेच परिमंडळ-दोन मधील पोलिसांनी हा ऐवज हस्तगत केला आहे. त्यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम, वाहने यासह इतर वस्तूंचा समावेश आहे. हा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना देण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते, त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण करून नवी मुंबई पोलिसांकडून हा मुद्देमाल संबंधितांना परत दिला जाणार आहे.गुरुवारी पोलीस आयुक्तालयात विशेष कार्यक्रमांतर्गत संबंधित ८३ तक्रारदारांकडे त्यांचा ऐवज सुपूर्द केला जाणार आहे. त्यामुळे गुन्ह्यात चोरीला गेलेला ऐवज पुन्हा हाती पडल्याचे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलणार आहे. गतवर्षीही अशा स्वरूपाचा कार्यक्रम नवी मुंबई पोलिसांनी घेऊन त्यामध्ये १९१ गुन्ह्यांतील चार कोटी तीन लाखांचा ऐवज संबंधित तक्रारदारांना परत केला होता.