शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

लॉकडाऊनमध्येही १६६ जहाजांची हाताळणी, जेएनपीटीच्या गुणांकामध्ये ४६ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 1:31 AM

जेएनपीटीने आयात-निर्यातीसाठी विविध उपक्रम राबवत, जून महिन्यात ८९ टक्के कंटेनर मालाची व ५११ ट्रेन्सची हाताळणी करून नवीन विक्रम स्थापित केला आहे. ​​​​​​​

- मधुकर ठाकूरउरण : शंभर दिवसांच्या लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या जेएनपीटीने ग्लोबल सप्लाई चेन सक्रिय ठेवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जेएनपीटीने आयात-निर्यातीसाठी विविध उपक्रम राबवत, जून महिन्यात ८९ टक्के कंटेनर मालाची व ५११ ट्रेन्सची हाताळणी करून नवीन विक्रम स्थापित केला आहे.जेएनपीटी हे देशातील प्रमुख बंदर आहे. कोरोना महामारीमुळे सुरू   असलेल्या राष्ट्रव्यापी लॉकडाऊनच्या काळात जेएनपीटीने मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात ५.२९ टक्के अधिक म्हणजेच २ लाख ८९ हजार २९३ टीईयू इतक्या कंटेनर मालाची तर एकूण १६६ जहाजांची हाताळणी केली आहे, तसेच मागील वर्षीच्या जूनमध्ये ५.६३ टक्के मालाची वाहतूक केली होती.या वर्षी जूनमध्ये ४.०७ दशलक्ष टन्स मालाची वाहतूक केली आहे. ती जून, २०१९ मधील ५.५३ टक्के दशलक्ष टनांच्या तुलनेत २७.६४ टक्के कमी आहे. लॉकडाऊनचे निर्बंध कमी केल्यामुळे व कारखाने सुरू झाल्यामुळे जेएनपीटीने जून, २०१९च्या तुलनेत या महिन्यात ८९% मालाची निर्यात केली असल्याचा दावा प्रसिद्धीपत्रकातून जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी सेठी यांनी केला आहे.रेल आॅपरेशन्समध्ये जेएनपीटीने मे, २०२० मध्ये ४९९ ट्रेन्सची हाताळणी केली होती. त्यानंतर, जून महिन्यात ५११ ट्रेन्सची हाताळणी करून नवीन विक्रम स्थापित केला आहे, तसेच मागील वर्षी जून महिन्यात रेल्वेची गुणांक संख्या १६.०४% पर्यंत होती. २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या सरासरी रेल्वे गुणांकामध्ये २३.४०% वाढ होऊन ४६% पोहोचली आहे. मालाच्या जलद निर्गमनासाठी पोर्टने लॉकडाऊन कालावधीत विस्तारित गेट सुविधेच्या रूपात आयसीडी मुलुंडसाठी १०६ ट्रेन्सद्वारे ६९५७ टीईयू इतक्या मालाची हाताळणी केली आहे.जेएनपीटी देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी आपले योगदान व पाठिंबा देतच राहील. सर्व भागधारकांच्या पाठिंब्याने बंदराच्या निरंतर विकासासाठी कर्तव्ये पार पाडत राहू आणि एक राष्ट्र म्हणून आपण या कोरोनाच्या संकटातून लवकरच बाहेर पडून अधिक सामर्थ्यवान होऊ, असा दृढ विश्वासही जेएनपीटीअध्यक्ष संजय सेठी यांनी शेवटी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केला आहे.

टॅग्स :JNPTजेएनपीटीNavi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबईRaigadरायगड