शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ परिसरातील डुंगी गावाचे पुनर्वसन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 02:17 IST

सिडकोचा निर्णय : स्थलांतर करणाऱ्यांना विशेष पुनर्वसन पॅकेज

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पालगत असलेल्या डुंगी गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. स्थलांतर करणाºया बांधकामधारकांना विशेष पुनर्वसन आणि पुन:स्थापन पॅकेजचा लाभ दिला जाणार आहे. गाव विमानतळाच्या गाभा क्षेत्राच्या बाहेर असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाप्रमाणे रायगड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पुनर्वसन केले जाणार आहे.

विमानतळासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे परिसरातील डुंगी गावामध्ये गतवर्षी पाणी शिरले होते. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. भरावाचे काम सुरू झाल्यानंतरच्या पहिल्याच पावसाने धोक्याचा इशारा दिल्यानंतर या गावचेही दहा गावांप्रमाणे पुनर्वसन केले जावे, अशी मागणी होऊ लागली होती. गतवर्षी अतिवृष्टीचा फटका बसल्यानंतर रायगडचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सिडकोेचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी गावास भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली होती. केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र पुणे यांनीही त्यांच्या अहवालामध्ये डुंगी गावाचे पुनर्वसन करण्याबाबतची शिफारस केली होती. त्याचप्रमाणे सिडकोने मार्च २०१६ मध्ये राज्याचे निवृत्त मुख्य सचिव जयंत बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली होती. त्या समितीनेही डुंगी गावच्या मूळ जागी किंवा नवीन जागेवर पुनर्वसन करण्याची शिफारस केली होती. या गावालगत विमानतळ परिचालनाकरिता सॅटेलाइट स्टेशन प्रस्तावित असल्याने बांधकामांच्या उंचीवर येणारे निर्बंध तसेच डुंगी गावातील उपलब्ध जागा व नियोजन आराखड्यानुसार आवश्यक मोकळी जागा, रस्त्यांचे जाळे व बाजूस सोडावयाचे अंतर यांचा विचार करता पुनर्वसन इतर ठिकाणी करण्याचा अभिप्राय मुख्य परिवहन आणि दूरसंचार यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणून या गावाचे पुनर्वसन गाभा क्षेत्रातील इतर गावांप्रमाणे करण्याचा निर्णय घेतला आहे.च्डुंगी गावातील बांधकामधारकांच्या पुनर्वसनाकरिताचा खर्च सिडको करणार आहे. हे गाव विमानतळाच्या गाभा क्षेत्राच्या बाहेर असल्याने त्याचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदींनुसार रायगड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. पुनर्वसनासाठीचे सर्वेक्षण आणि पात्रतानिश्चितीही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ