शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता खचल्याने डम्पर रुतला, जीवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 02:17 IST

जीवितहानी टळली : खोदकामाच्या ठिकाणी मातीचा भराव

नवी मुंबई : खडीची वाहतूक करणारा डम्पर खचलेल्या रस्त्यात रुतल्याचा प्रकार वाशीत घडला. गुरुवारी दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे त्या ठिकाणी काही वेळासाठी रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. रस्त्यावर खोदकाम केल्यानंतर त्यावर योग्यरीत्या डांबरीकरण न करण्यात आल्याने हा अपघात घडला असून, थोडक्यात मोठी दुर्घटना टळली.

वाशी सेक्टर १० येथील साईनाथ हायस्कूलच्या मार्गावर हा अपघात घडला. सदर मार्गावर चार शाळा व महाविद्यालये आहेत. यामुळे त्या ठिकाणावरून शाळकरी विद्यार्थ्यांची स्कूल बस, व्हॅनने अथवा पायी मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. तीन महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते. तर पावसाची चाहूल लागताच तिथल्या खोदकामावर मातीचा भराव टाकून खड्डा बुजवण्यात आला आहे. मात्र, दोन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे तिथल्या मातीचा चिखल झाला आहे. अशातच गुरुवारी दुपारी तिथल्या रस्त्यावरून खडीचा डम्पर जात असताना त्याचे चाक खोदकामाच्या ठिकाणी खचलेल्या रस्त्यात रुतले. यामुळे डम्पर एका बाजूला झुकून तिथेच अडकून पडला होता. अखेर क्रेनच्या साहाय्याने हा रुतलेला डम्पर त्या ठिकाणावरून काढण्यात आला. तोपर्यंत सदर मार्गावर रहदारीला अडथळा निर्माण झाला होता.जर अपघाता वेळी त्या ठिकाणी एखादी स्कूलबस असती, अथवा खोदकामाच्या ठिकाणी खचलेल्या रस्त्यात स्कूलबसच अडकली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली असती. वाशी परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्या आहेत. रस्त्यांचे खोदकाम केल्यानंतर तिथला खड्डा बुजवण्याकडे ठेकेदारासह प्रशासनाकडून डोळेझाक केली जाते. यामुळे रस्ता खोदल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी डांबरीकरण करण्याऐवजी मातीचा भराव टाकून थुकपट्टीची कामे केली जात आहेत. मागील चार महिन्यांत शहरात अनेक ठिकाणी विविध कामानिमित्ताने रस्त्यांची खोदकामे झाली आहेत. त्यापैकी बहुतांश ठिकाणी अशाच प्रकारे मातीचा भराव टाकून खड्डे बुजवण्यात आले आहेत. अशा ठिकाणी पावसामुळे पुन्हा खड्डे पडून अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईroad safetyरस्ते सुरक्षा