शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे भाजीपाला कचऱ्यात, किरकोळ मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 06:21 IST

१० ते १५ टक्के भाजीपाला कुजला.

नवी मुंबई : पावसामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. १० ते १५ टक्के भाजीपाला फेकून द्यावा लागत आहे. मुंबई बाजार समितीमध्ये पाच दिवसांत पालेभाज्यांच्या तीन लाख जुड्या फेकून द्याव्या लागल्या आहेत. पालेभाज्यांच्या कचऱ्याचे प्रमाण ५० टनावरून ७५ टनावर पोहोचले आहे. भाजीपाला खराब होत असल्यामुळे किरकोळ मार्केटमध्येही भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन ४०० ते ६०० ट्रक, टेम्पोमधून दोन हजार ते ३ हजार टन भाजीपाला विक्रीसाठी येत असतो. सोमवार ते शुक्रवार पावसामुळे आवक कमी होती. शुक्रवारी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे आवक वाढली. 

५८२ ट्रक, टेम्पोमधून २७९६ टन भाजीपाला विक्रीसाठी आला असून त्यामध्ये ५ लाख १५ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे, मात्र पावसामुळे भाजीपाला खराब होऊन १० ते १५ टक्के माल फेकून द्यावा लागत आहे. सोमवार ते शुक्रवारदरम्यान सुमारे तीन लाख जुड्या भाजीपाला फेकून द्यावा लागला आहे. मार्केटमध्ये गेल्या आठवड्यात प्रतिदिन ५० टन कचरा तयार होत होता. सोमवारपासून सरासरी ७५ टन कचरा तयार होत आहे.

फरसबी, वाटाणा महागलापाावसामुळे वाटाणा, फरसबी, दुधी भोपळा यांचे दर वाढले आहेत. किरकोळ मार्केटमध्येही माल खराब होत असल्यामुळे सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. अनेक भाज्यांचे दर प्रतिकिलो १०० रुपयांवर पोहचले आहेत. फरसबीचे दर १२५ रुपयांवर आणि  वाटाण्याचे दर १५० रुपये किलोवर पोहोचले आहेत. भाजीपाला खराब होत असल्यामुळे दर काही प्रमाणात वाढल्याची माहिती किरकोळ विक्रेत्यांनी दिली.

एपीएमसी व किरकोळ मार्केटमधील प्रतिकिलो दरवस्तू          होलसेल दर    किरकोळ दरवाटाणा         ८० ते १२०    १२० ते १५०फरसबी        ७० ते १००    १०० ते १२० गवार             ३४ ते ६०    १०० ते १२० घेवडा            ४० ते ६०    ८० ते १००शेवगा शेंग     ३० ते ४५    १०० ते १२० तोंडली           २५ ते ४५    १०० ते १२०

टोमॅटो, वांगी स्वस्तपावसाळा सुरू झाल्यापासून टोमॅटोचे दर कमी झाले आहेत. होलसेल मार्केटमध्ये टोमॅटोचे दर १५ ते २६ रुपये किलो असून किरकोळ मार्केटमध्येही ४० ते ५० रुपये किलो दराने ते उपलब्ध होत आहेत. 

 

टॅग्स :vegetableभाज्याNavi Mumbaiनवी मुंबई