शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या पाऱ्यामुळे मडक्यांची मागणी वाढली; नवी मुंबईसह पनवेलमध्ये दररोज शेकडो माठांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 00:50 IST

उन्हाळा सुरू झाला की, घामाच्या धारा आणि उन्हाच्या झळांमुळे थंड पाणी पिण्याची इच्छा होते. साध्या पाण्यामुळे तहान भागत नसल्याने पारंपरिक पद्धतीने थंड होणाऱ्या मडक्यामधील पाण्याकडे नागरिक आकर्षित होऊ लागले आहेत.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : उन्हाळा सुरू झाला की, घामाच्या धारा आणि उन्हाच्या झळांमुळे थंड पाणी पिण्याची इच्छा होते. साध्या पाण्यामुळे तहान भागत नसल्याने पारंपरिक पद्धतीने थंड होणाऱ्या मडक्यामधील पाण्याकडे नागरिक आकर्षित होऊ लागले आहेत. त्यामुळे फ्रीजमुळे दुर्लक्षित झालेल्या मडक्याला मागणी वाढली आहे. यामुळे मडकी बनविणाºया कारागिरांनाही रोजगार प्राप्त झाला असून, नवी मुंबईसह पनवेलमध्ये दररोज शेकडो मडक्यांची विक्री होत आहे.नवी मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण वाढले असून, पाणी थंड करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने होणारा मडक्यांचा वापरदेखील वाढत आहे. फ्रीजमधील थंड पाणी कितीही प्यायले तरी तहान भागत नाही. तसेच उष्णतेत अतिथंड पाण्यामुळे सर्दी, खोकला यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने वापरल्या जाणाºया आणि विसर पडलेल्या मडक्यांना मागणी वाढली आहे. राजस्थान, गुजरात आदी भागातून नवी मुंबईसह पनवेल शहरात दररोज हजारो मडकी विक्रीसाठी येत आहेत. नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी नर्सरी आहेत. या नर्सरीमध्ये मोठ्या प्रमाणावर मडकी विक्र ीसाठी उतरविण्यात येतात. मडकी आल्यावर त्यांना गेरू आणि सुरमा रंग देणे, मडक्यांना चकाकी येण्यासाठी पॉलिश करणे, नळ बसविणे, गोलाकार मडक्यांना सिमेंटचे पाय बसविणे आदी कामे करून त्यांना आकर्षक केले जाते. त्यानंतर ही मडकी विक्रेते तीनचाकी सायकल किंवा डोक्यावर मोठ्या टोपल्या घेऊन विक्री साठी शहरात फिरताना दिसत आहेत.उन्हाळ्यामुळे पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणाºया मडक्यांना तसेच कारागीर, विक्र ी करणारे कामगार यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढत आहे. यामुळे फ्रीजपेक्षा मडक्याच्या वापरास प्राधान्य दिले जात आहे.गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात मडक्यांची मागणी मोठ्याा प्रमाणावर वाढली आहे. मडक्यांना रंग देणे, पॉलिश करणे, नळ आणि पाय बसविणे आदी काम केल्यावर मडक्यांची विक्र ी केली जाते. सध्या मागणी वाढल्याने कारागिरांना चांगला रोजगारदेखील प्राप्त होत आहे.- शिवा साहू,मडकेविक्रे ता

टॅग्स :Waterपाणी