शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

केंद्राच्या निधीअभावी रखडले नाला व्हिजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 04:24 IST

जेएनएनयूआरएम अंतर्गत नाला व्हिजन राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. यासाठी ७४ किलोमीटर लांबीच्या २९ नाल्यांची सुधारणा, साफसफाई व संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ताव तयार करून केंद्राकडे पाठविला होता.

- नामदेव मोरेनवी मुंबई  - जेएनएनयूआरएम अंतर्गत नाला व्हिजन राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. यासाठी ७४ किलोमीटर लांबीच्या २९ नाल्यांची सुधारणा, साफसफाई व संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ताव तयार करून केंद्राकडे पाठविला होता. दहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही तो प्रस्ताव मंजूर न झाल्यामुळे नाला व्हिजन रखडले असून, ही कामे करण्यासाठी पालिकेला तब्बल ७०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.केंद्र शासनाने २००५ मध्ये दहा लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधील नागरी सुविधांसाठी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना (जेएनएनयूआरएम) सुरू केली. नवी मुंबई महानगरपालिकेनेही या योजनेमधून जास्तीत जास्त निधी शहराला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पाणीपुरवठा, मलनि:सारण व परिवहनमध्ये बस खरेदी ही कामे या योजनेअंतर्गत करण्यात आली. पालिकेने पाठविलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये नाला व्हिजनचाही समावेश आहे. महापालिका कार्यक्षेत्रामधील सद्यस्थितीमध्ये सर्वात गंभीर विषय आहे. डोंगरावरून खाडीकडे पावसाचे पाणी घेऊन जाणारे २० नाले शहरामध्ये आहेत. या नाल्यांची एकूण लांबी ७४ किलोमीटर एवढी आहे. काही नाल्यांची लांबी ४०० मीटर तर काहींची तब्बल ७ किलोमीटर एवढी आहे. नाल्यांची साफसफाई केली जात नसल्यामुळे त्यामध्ये गाळ साचला आहे. दगड अस्ताव्यस्त स्वरूपात नाल्यात पडले आहेत. डेब्रिज माफियांनी बांधकामांचा कचरा टाकून नाल्यांचा आकार कमी करण्यास सुरुवात केली आहे. दिघा ते शिरवणेपर्यंत नाल्याच्या बाजूला झोपड्यांचे बांधकाम झाले आहे. पावसाचे पाणी झोपड्यांमध्ये जाऊन यापूर्वी जीवितहानीही झाली आहे. भविष्यातही अशाप्रकारच्या घटना घडण्याची शक्यता आहे.दिघा, ऐरोली, इंदिरानगर व इतर अनेक ठिकाणी नैसर्गिक नाल्यांना संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. नगरसेवकांनीही सभागृहामध्ये याविषयी आवाज उठविला आहे. परंतु दहा वर्षांपासून जेएनएनयूआरएम अंतर्गत नाला व्हिजन राबविले जाणार असल्याचे आश्वासन प्रशासनाकडून दिले जात होते. केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू असून, हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कामे केली जाणार असल्याचे सांगितले जात होते. शहरासाठी महत्त्वाच्या या प्रकल्पासाठी प्रशासनासह दहा वर्षांतील खासदारांनीही पाठपुरावा केला होता; परंतु हा प्रस्ताव मान्य झाला नाही. लोकप्रतिनिधीही केंद्राकडून निधी आणण्यात अपयशी ठरले. यामुळे भविष्यात पालिकेला स्वखर्चाने ही कामे करावी लागणार आहेत. शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई करणे, नाल्यांचे पात्र पूर्ववत करणे व इतर कामे करण्यासाठी तब्बल ७०० कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. भविष्यात केंद्राचा निधी यासाठी मिळविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. निवडणुकीमही उमेदवार त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हा विषय घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जाहीरनाम्यात येणार का नाला व्हिजनलोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून शहरवासीयांना प्रश्न सोडविण्याची आश्वासने दिली जात आहेत. निवडणुकीमध्ये उमेदवार त्यांचे जाहीरनामेही प्रसिद्ध करतात. नवी मुंबईमधील नैसर्गिक नाल्यांची सुधारणा करण्याचा विषय जाहीरनाम्यात घेतला जावा, अशी अपेक्षा शहरवासीयांनी केली आहे.शहरामधील नाल्यांची सद्यस्थितीनाल्यांमध्ये गाळ साचला असून, दगडांमुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत.बोनसरी व दिघा परिसरामध्ये पावसाचे पाणी नागरी वस्तीमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नाल्यांमध्ये डेब्रिज व इतर कचरा टाकला जात आहे.नाल्यांच्या काटावर झोपड्या व इतर बांधकामे झाली आहेत.विकासासाठी अनेक ठिकाणी नाल्यांचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न झाला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई