शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुविधांअभावी पालिकेची स्पोर्ट्स नर्सरी बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 23:55 IST

२०११ मध्ये नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सीबीडीतील राजीव गांधी क्रीडा संकुलात स्पोर्ट्स नर्सरी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : शहरातील तीन ते सहा वयोगटातील लहान मुलांमध्ये क्रीडा क्षेत्राची आवड निर्माण व्हावी, यासाठी २०११ मध्ये नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सीबीडीतील राजीव गांधी क्रीडा संकुलात स्पोर्ट्स नर्सरी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमाला पालकांनीही चांगला प्रतिसाद देत पाल्यांना सहभागी केले होते; परंतु स्पोर्ट्स नर्सरीसाठी स्वतंत्र जागा नसल्याने तसेच सुविधा उपलब्ध न झाल्याने तीन वर्षांतच हा उपक्र म बंद पडला, यामुळे महापालिकेचा मूळ उद्देश हवेत विरला आहे. लहान मुलांसाठी योग्य असलेला उपक्र म महापालिकेने सुरू करण्याची मागणी सध्या पालकांकडून होत आहे.नवी मुंबई महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी आजवर अनेक वेगवेगळे उपक्र म राबविले आहेत. सध्या लहान मुलांना मोबाइल आणि टीव्हीचे वेड लागल्याने क्र ीडा क्षेत्रातील त्यांची आवड कमी होतआहे, त्यामुळे त्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटत आहे. लहान वयातच मुलांमध्ये क्र ीडा क्षेत्राची आवड निर्माण होऊन त्यांचे शारीरिक स्वास्थ टिकावे आणि वाढावे, तसेच शहरात क्र ीडापटू घडतील या उद्देशाने महापालिकेने लहान मुलांसाठी स्पोर्ट्स नर्सरी उपक्र म सुरू केला होता. पालिकेने राबविलेल्या उपक्र माला पालकांनीही चांगला प्रतिसाद दिला. सीबीडी, सीवूड आणि नेरु ळ परिसरातील जवळपास ८० हून अधिक लहान मुले सहभागी झाली होती. आठवड्यातून चार दिवस संध्याकाळी दोन तास चालणाऱ्या उपक्र मात लहान मुलांचे वय, वजन आणि उंची यांची योग्य वाढ व्हावी, हा प्रामुख्याने उद्देश ठेवण्यात आला होता. लहान वयात सर्वच क्र ीडा खेळांची आवड निर्माण व्हावी, यासाठी धावणे, हॉलिबॉल, फुटबॉल, योगा सारखे खेळ प्रशिक्षकांमार्फत शिकविण्यात येत होते. क्रीडा नर्सरीमध्ये लहान मुलांना घेऊन येणाºया पालकांसाठीही क्रीडा संकुलावर योगा प्रशिक्षण केंद्राचे आयोजन करण्यात आले होते. क्र ीडा संकुलावर स्पोर्ट्स नर्सरीसाठी स्वतंत्र जागा आणि आवश्यक सुविधा नसल्याने क्र ीडा संकुलावरच मुलांना प्रशिक्षण द्यावे लागत होते. तसेच या मैदानावर सुरू असलेले क्रि केट सामने यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दादेखील ऐरणीवर आला होता. अशा अनेक समस्यांमुळे लहान मुलांसाठी मोठी उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून सुरू केलेली स्पोर्ट्स नर्सरी अवघ्या तीन वर्षांतच बंद पडली. पालिकेने लहान मुलांसाठी सुरू केलेला स्पोर्ट्स नर्सरी उपक्र म पुन्हा सुरू करावा, अशी मागणी पालक करीत आहेत.>शहरातील लहान मुलांना क्र ीडा क्षेत्राची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने महापालिकेच्या माध्यमातून स्पोर्ट्स नर्सरी हा उपक्र म सुरू करण्यात आला होता. जागेची उपलब्धता पाहून नागरिकांच्या मागणीनुसार हा उपक्र म पुन्हा सुरू करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने सुविधादेखील निर्माण करून दिल्या जातील.- नितीन काळे,उपआयुक्त, क्र ीडा विभाग