शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे नवी मुंबईतील आठ वसाहतींना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 02:35 IST

चार दिवस पावसाने झोडपल्यामुळे नवी मुंबईही जलमय झाली आहे. गतवर्षी १० जुलैपर्यंत ८०९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी प्रमाण दुप्पट झाले असून, तब्बल १६८५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई  - चार दिवस पावसाने झोडपल्यामुळे नवी मुंबईही जलमय झाली आहे. गतवर्षी १० जुलैपर्यंत ८०९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी प्रमाण दुप्पट झाले असून, तब्बल १६८५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शहरातील आठ वसाहतींमध्ये भूस्खलन होण्याची शक्यता असून, ३७८ धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मुसळधार पावसामुळे इंदिरानगर परिसरातील गणपती पाडा येथे झोपडी पडली असून, जवळपास १५ घरेही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घरात कोणी नसताना ही दुर्घटना घडल्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. मंगळवारी चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे शहरातील इतर ठिकाणीही भूस्खलन होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आपत्कालीन विभागाने यापूर्वीच आठ झोपडपट्ट्यांमध्ये भूस्खलन होण्याची शक्यता असून, रहिवाशांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने ३७८ इमारती धोकादायक घोषित केल्या असून, त्यामधील ५८ इमारती अतिधोकादायक आहेत. या सर्व इमारतींमधील रहिवाशांना घरांचा वापर थांबविण्यात यावा, अशा सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. दुर्घटना होण्याची शक्यता असलेल्या सर्व ठिकाणी प्रशासनाने सूचना दिलेल्या असून, काही ठिकाणी सूचना फलकही लावले आहेत. गणपतीपाडा येथील दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नवी मुंबईमध्ये २६ जुलै २००५च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गतवर्षी १० जुलैपर्यंत मनपाक्षेत्रामध्ये ८०९ मि. मी. एवढी पावसाची नोंद झाली होती. यावर्षी पावसाने नवीन विक्रम प्रस्थापित केला असून, १६०५ मि. मी. नोंद झाली आहे. मोरबे धरण परिसरामध्येही १६०१ मि. मी. एवढी पावसाची नोंद झाली असून, धरण ८२.७० मीटरपर्यंत भरले आहे. महापालिकेने आठ विभाग कार्यालय, अग्निशमन केंद्र व मुख्यालयामधील आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.उरण फाट्यावर टँकरला अपघातसायन-पनवेल महामार्गावर उरण फाटा येथे एच.पी. कंपनीचा टँकर रोडच्या कठड्यावरून खाली कोसळला. एकता विहार सोसायटीला लागून असलेल्या पॉवर हाउसवर पडला. टँकर रोडपासून जवळपास १०० फूट खाली कोसळल्यामुळे जोरदार आवाज झाला व परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दिवसभर या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.पामबीच रोडवर ट्रेलरचा अपघातपामबीच रोडवर अवजड वाहनांना बंदी घातली आहे; परंतु नियम धाब्यावर बसवून रात्री अवजड वाहने या रोडवरून जात आहेत. सोमवारी मध्यरात्री बेलापूरच्या दिशेने जाणारा ट्रेलर नेरुळ-उरण रेल्वे ब्रिजच्या खाली अडकला, यामुळे या मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. उंची मर्यादेसाठीचे गेट तोडून कंटेनर पुलाला धडकला. या घटनेमुळे पामबीच रोडवर अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.आवक घसरलीमुसळधार पावसाचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावरही झाला आहे. सोमवारी ५ मार्केटमध्ये १८७४ ट्रक व टेंपोची आवक झाली होती. मंगळवारी फक्त १३०१ वाहनांमधून कृषी मालाची आवक झाली आहे. पावसामुळे ग्राहकांनीही पाठ फिरविली होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRainपाऊस