शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या डब्यात शिरलेल्या मद्यपीची पोलिसाला मारहाण; पनवेल - ठाणे लोकलमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 12:57 IST

अखेर लोकल ठाणे रेल्वेस्थानकात आल्यावर तेथील पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : पनवेल-ठाणे लोकलमध्ये रविवारी रात्री नशेत महिलांच्या डब्यात शिरलेल्या एका मद्यपीस ड्युटीवरील पोलिसाने खाली उतरण्यास सांगितले. त्यावेळी त्याने नकार  दिला आणि पोलिसाला मारहाण केली. यानंतर लोकल कोपरखैरणे स्थानकात आल्यावर बाजूच्या डब्यातील प्रवाशांनी येऊन त्या मद्यपीला समजावण्याचा  प्रयत्न केला. मात्र, तरीही त्याने ऐकले नाही. अखेर लोकल ठाणे रेल्वेस्थानकात आल्यावर तेथील पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

पोलिसाला मारहाण करणाऱ्या मद्यपीचे नाव भालेंद्र लक्ष्मण द्विवेदी असे आहे. त्याने पोलिस शिपाई आकाश भारूड यांच्यासोबत गैरवर्तन केले. ते ठाणे पोलिसांत कार्यरत आहेत. रविवारी रात्री रात्री सव्वा अकराच्या सुमारास आराेपी भालेंद्र लक्ष्मण द्विवेदी हा मद्याच्या नशेत जुईनगर स्थानकात महिलांच्या डब्यात शिरला. त्यावेळी ड्युटीवर असलेले भारूड यांच्यासह इतर दोन महिला प्रवशांनी त्यास खाली उतरण्याची विनंती केली. मात्र, त्यास नकार देऊन त्याने हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. 

हा गुन्हा जुईनगर ते कोपरखैरणे रेल्वेस्थानकादरम्यान घडल्याने ठाणे रेल्वे पोलिसांनी द्विवेदी याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला पुढील कार्यवाहीसाठी वाशी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

 

टॅग्स :Harbour Railwayहार्बर रेल्वेCrime Newsगुन्हेगारी