शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

आंबेडकर रोडवर सर्वत्र घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: July 16, 2015 23:46 IST

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील ‘क’ प्रभागक्षेत्र कार्यालयांतर्गत ‘३४ डॉ. आंबेडकर रोड’ या प्रभागातील बऱ्याच भागात पायवाटा, गटारींच्या नावाने बोंबाबोंब आहे.

- अरविंद म्हात्रे,  चिकणघरकल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील ‘क’ प्रभागक्षेत्र कार्यालयांतर्गत ‘३४ डॉ. आंबेडकर रोड’ या प्रभागातील बऱ्याच भागात पायवाटा, गटारींच्या नावाने बोंबाबोंब आहे. ठराविक ठिकाणीच पायवाटा आहेत. कचरा चार-चार दिवस उचलला जात नसल्याने प्रभागात घाणीचे साम्राज्य आहे. याबाबत नगरसेविकेला तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्न्याने समस्या तशाच असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.या प्रभागातील मुर्गी मोहल्ला परिसरात पायवाटा आणि गटारींची कामे झालेली नाहीत. गल्लीसमोरच कचऱ्याचे ढीग असून त्यावर कुत्री वावरतात. यामुळे दुर्गंधीचा सामना रहिवाशांना करावा लागतो. याबाबत नगरसेविका तक्रारी करूनही का लक्ष देत नाही? अशीच अवस्था संत रोहिदास वाड्याची आहे. येथे काही ठिकाणी पायवाटा आहेत. परंतु, मारूती मंदिरजवळ वर्षभरापासून गटारी नादुरूस्त असल्यामुळे घाणपाणी साठते. यामुळे मंदिरात येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रभागही अधिकाधिक स्लम आहे. या प्रभागात डॉ. आंबेडकर रोड, पाठारे नर्सरी, रोहिदास वाडा, मदारछल्ला, सुभाष मैदान, शंकरराव चौक, मनपा कर्मचारी वसाहत, वलीपीर रोडच्या जोकर सिनेमाजवळील परिसर, क्रिश्ना नगर, मुर्गी मोहल्ला, शेख बाबूचाळ असा परिसराचा समावेश आहे. नगरसेविकेचे परिसराच्या समस्यांकडे गांभिर्याने लक्ष नसल्यामुळे नागरिकांना पायाभूत सुविधांपासूनही वंचित रहावे लागत असल्याचे चित्र या प्रभागात हिंडताना दिसून येते.क्रिश्नानगरमध्ये गटारी तुंबलेल्या आहेत. पायवाटा ठिकठिकाणी निखळलेल्या आहेत. कचऱ्याची उचल नियमित नाही. यामुळे या भागाला बकालवस्था आहे. विशेष म्हणजे मनपा कर्मचारी वसाहतीत सुद्धा सुविधांची वाणवा आहे. मनपाचे ‘क’ प्रभाग अधिकारी आणि या प्रभागाच्या नगरसेविका करतात तरी काय? नागरिकांच्या असुविधांकडे त्यांचे का लक्ष नाही? डॉ. आंबेडकर रोडला मध्येमध्ये पडलेले खड्डे बुजविले आहेत. मात्र दोन्ही बाजूंच्या गटारी आणि साठलेला कचरा याकडे लक्षच नसल्याने या रोडवरून चालताना घ्ाांणीच्या साम्राज्याला सामोरे जावे लागते. कचरा साठलेल्या जागी माशा घोंगावत आहेत. कृत्री वावरत आहेत. डासांचा प्रादुर्भाव आहे आणि त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीची भिती आहेच. या प्रभागात दखल घेण्यासारखी विकासकामे झाल्याचे दिसत नाहीत. काही ठिकाणी खाजगी मालकांच्या चाळी आहेत. तेथे काम करण्यास मज्जाव आहे, या भागात ब्रिफची दुकाने असल्याने त्यांची घाण कचरा कुंडीत टाकली जाते. दुर्गंधीमुळे मनपाचे सफाई मुकादम कचरा उचलण्यास चालढकल करतात. मनपा आयुक्तांना याबाबत सांगितले आहे. राहिलेल्या गटारे, पायवाटांना अडचणी आहेत. - उषा रमेश वाळंज, नगरसेविका, प्र्रभाग -३४,