शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

डॉलरच्या बहाण्याने फसवणूक, एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 01:53 IST

एकास अटक: स्वस्तात अमेरिकन डॉलर देण्याचे दाखविले आमिष

नवी मुंबई : स्वस्तात अमेरिकन डॉलर देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. कोपरखैरणेत एक गुन्हा करून पळून जात असतानाच त्याला सापळा रचून अटक केली आहे. निम्याहून कमी किमतीत अमेरिकन डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. मागील काही महिन्यांत अशा प्रकारच्या दहा घटना समोर आल्या आहेत. त्यापैकी चार गुन्हे घणसोलीत, दोन कोपरखैरणेत तर दोन खारघर परिसरात घडले आहेत.

एखाद्या व्यक्तीला अमेरिकन डॉलरच्या मोहात पाडून त्याला स्वस्तात डॉलर देण्याचे आमिष दाखवले जाते. त्यानंतर गर्दीच्या ठिकाणी सदर व्यक्तीला व्यवहारासाठी बोलावून पैसे घेतल्यानंतर त्याच्या हाती कागदाचे बंडल देऊन पळ काढला जातो. अशा घटनांची उकल करण्यासाठी गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पथक प्रयत्नात होते. त्यानुसार कोपरखैरणे परिसरात एक जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे उपायुक्त प्रवीणकुमारपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अर्जुन गरड यांच्या पथकाने मंगळवारी रात्री परिसरात सापळा रचला होता. या वेळी तीन टाकी परिसरातून मोहम्मद इक्बाल मोहम्मद सिराज सिकदार (२३) याला अटक करण्यात आली.पोलिसांचे नागरिकांना आवाहनएका महिलेच्या इशाºयावरून तो कोपरखैरणे गावात आला होता. त्या ठिकाणी भारतीय चलनाच्या ७० हजार रुपयांच्या बदल्यात एक हजार अमेरिकन डॉलर देणार होता. प्रत्यक्षात मात्र संबंधित व्यक्तीकडून दहा हजार रुपये घेतल्यानंतर त्याच्याकडे कागदाचे बंडल देऊन गर्दीत पळ काढला.पोलिसांच्या पथकाने तीन टाकी परिसरातून त्याला अटक केली. त्याच्याकडून इतरही अनेक गुन्हे उघड होऊन त्याच्या टोळीचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या फसव्या आमिषाला बळी न पडण्याचेही आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी