शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

...जो गुलाल उधळला, त्याचा अपमान होऊ देऊ नका; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्याना विनंती 

By योगेश पिंगळे | Updated: January 27, 2024 13:23 IST

मराठा आरक्षणातील मागण्यांचा शासनाने काढलेला अध्यादेश वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी झालेल्या सभेत जरांगे बोलत होते.

नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या लढाईत सग्यासोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश शासनाने काढला आहे. त्यासाठी मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांचे आभार मानत मनोज जरांगे पाटील यांनी या जीआरमुळे जो गुलाल उधळला त्याचा अपमान होऊ देऊ नका अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली. मराठा आरक्षणातील मागण्यांचा शासनाने काढलेला अध्यादेश वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी झालेल्या सभेत जरांगे बोलत होते.           शपथपत्र घेऊन प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा, गृहचौकशीसाठी अडवू नका अशी विनंती देखील यावेळी त्यांनी केली. मराठा समाजातील जास्तीत जास्त नागरिकांना प्रमाणपत्र मिळावे यासाठी शिंदे समितीला टप्याटप्याने १ वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. गावखेड्यामध्ये ओबीसी आणि मराठा समाज गोण्या-गोविंदाने एकत्र राहतो नेते, आमच्यात भांडणे लावत असल्याचा आरोप करत छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. मनोज जरांगे यांनी शुक्रवार पासून सुरु केलेले उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस घेत सोडले. 

देशाचंच नव्हे तेर संपूर्ण जागाच लक्ष या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडे लागले होते. लाखोंच्या आंदोलन कोणतेही गालबोट न लागता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात यशस्वी केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. आंदोलनामुळे इतर कोणाला त्रास होऊ नये याची काळजी सुरुवातीपासून जरांगे पाटील आणि सर्व आंदोलकांनी घेतल्याचे ते म्हणाले. दिलेला शब्द पाळणे हीच माझी कार्यपद्धती असल्याचे सांगत मराठवाड्यात कुणबी नोंदी आधी सापडत नव्हत्या आता सापडू लागल्या आहेत. सरकारची मानसिकता देण्याची आहे घेण्याची नसल्याचे शिंदे म्हणाले. 

सर्वसामान्य माणूस जेव्हा आंदोलनाचं नेतृत्व करतो तेव्हा त्याला वेगळेपण येते. हा मुख्यमंत्रीसुद्धा एक सामान्य माणूस आहे म्हणून सामान्य माणसांना न्याय देण्याचे काम आम्ही केले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आजचा दिवस हा आनंदाचा दिवस, गुलाल उधळण्याचा दिवस असल्याचे ते म्हणाले. यावेळी आंदोलकांनी गुलालाची उधळण करत फटाके फोडून जल्लोष साजरा केला. जेसीबीतून पुष्टवृष्टी आणी गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी मंत्री गिरीश महाजन, दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर आणि लाखोंच्या संख्येने आंदोलक उपस्थित होते.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलNavi Mumbaiनवी मुंबईMaratha Reservationमराठा आरक्षण