शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या बैठकीमध्येही नाईकांच्या प्रवेशाची चर्चा; कार्यकर्त्यांकडून विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 23:58 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. मुंबईमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्येही या विषयावर चर्चा झाली. दरम्यान, नवी मुंबईमधील काही पदाधिकाऱ्यांनी नाईकांच्या प्रवेशास विरोध दर्शविला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु यानंतरही नाईक परिवार भारतीय जनता पक्षामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरूच आहे. राष्ट्रवादीच्या शहरातील प्रमुख पदाधिकाºयांनीही या वृत्ताचे खंडन केल्यानंतरही चर्चा सुरूच आहे. नाईक एका बड्या उद्योजकाच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडून थेट पक्षाध्यक्ष अमित शहा यांना प्रवेशाविषयी सांगितले जाणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यावरूनही चर्चा सुरू झाली आहे. नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात नाईकांच्या भूमिकेविषयी तर्कवितर्क लढविले जात आहे.मंगळवारी भाजपच्या मुंबईमध्ये झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्येही या विषयावर चर्चा झाली. याविषयी पदाधिकाºयांना विचारणा केली असता १० ते १५ जणांनी नाईकांच्या प्रवेशाला विरोध दर्शविला. आतापर्यंत कार्यकर्त्यांना झालेल्या त्रासाची माहितीही या वेळी देण्यात आली.

भाजप जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत व इतर पदाधिकाºयांनी नाईकांना विरोध करण्यासाठी प्रदेश कार्यालयात ठाण मांडल्याचे वृत्त समाजमाध्यमांमधून पसरू लागले होते. याविषयी माहिती घेण्यासाठी घरत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांची व कोअर कमिटीची बैठक नियमितपणे प्रदेश कार्यालयात होत असते.

कोअर कमिटीच्या मीटिंगसाठी ५० पेक्षा जास्त पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये काहींनी नाईकांच्या पक्षप्रवेशाची चर्चा असल्याचा विषय आला होता. तेव्हा काही पदाधिकाºयांनी विरोध केला, परंतु विरोध करण्यासाठी आम्ही पदाधिकारी घेऊन गेलो होतो या वृत्तामध्ये तथ्य नाही. माझी भूमिकाही मी त्या ठिकाणी मांडली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकBJPभाजपा