शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
2
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
3
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
4
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
5
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
6
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
7
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
8
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
9
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
10
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
11
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
12
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
13
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
14
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
15
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
16
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
17
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
18
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
19
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
20
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...

महासंचालकांकडून नेरूळ पोलिसांचा गौरव; सर्वोत्कृष्ट तपास

By admin | Updated: November 4, 2015 23:34 IST

घरफोडीच्या गुन्ह्याचा सर्वोत्कृष्ट तपास करून गुन्हेगाराला अटक केल्याप्रकरणी पोलीस महासंचालकांकडून नेरूळ पोलिसांना गौरवण्यात आले आहे. नेरूळ पोलीस ठाणे हद्दीत

नवी मुंबई : घरफोडीच्या गुन्ह्याचा सर्वोत्कृष्ट तपास करून गुन्हेगाराला अटक केल्याप्रकरणी पोलीस महासंचालकांकडून नेरूळ पोलिसांना गौरवण्यात आले आहे. नेरूळ पोलीस ठाणे हद्दीत नोव्हेंबर २०१४ मध्ये हा गुन्हा घडला होता. त्यामध्ये हरवलेल्या चावीवरून पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला होता.पामबीच रोडवरील सी ब्रिज टॉवरमध्ये हा गुन्हा घडला होता. तिथे राहणाऱ्या दीपा चौहाण यांच्या घरी घरफोडी झाली असता त्यामध्ये ६६ लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नेरूळ पोलिसांनी तपासाअंती त्यांचा जुना कार चालक सोहेब सुतार (२७) याला अटक केली होती. त्याने नोकरीवर असताना घरातील चाव्यांचा गुच्छा चोरला होता. यानंतर त्या घराबाहेर गेल्याचे समजताच सुरक्षा रक्षकाला हाताशी धरून तिथे घरफोडी केली होती. चौहाण यांच्या घरात सीसीटीव्ही बसवलेले होते. याची सुतारला माहिती असल्याने त्याने घटनेच्या काही दिवस अगोदर कॅमेराची वायर तोडली होती. ही बाब माहीत झाल्यानंतरही चौहाण यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. यामुळे त्या घराबाहेर गेल्याची संधी साधून त्याने सुरक्षा रक्षकाला विश्वासात घेवून त्याठिकाणी घरफोडी केली. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे, परिमंडळ उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संगीता अल्फांसो यांचे पथक तपास करत होते. तपासादरम्यान चौहाण यांच्या चौकशीत त्यांच्या घराच्या व कपाटाच्या चावीचा गुच्छा काही दिवसांपासून हरवलेला असल्याचे समजले. यावरून कामावरून काढलेला त्यांचा कारचालक सोहेब सुतारला ताब्यात घेतले असता घटनेचा उलगडा झाला. पोलीस आयुक्त प्रभात रंजन, अप्पर आयुक्त विजय चव्हाण यांनीही नेरूळ पोलिसांचे कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)