पनवेल : जम्मू काश्मीर दहशतवादी हल्ल्यात पनवेल खांदा कॉलनीत राहणाऱ्या दिलीप देसले यांचा मृत्यू झाला आहे. तर सुबोध पाटील आणि त्यांच्या पत्नी माणिक पाटील हे दोन जण जखमी आहेत.निसर्ग ट्रॅव्हल्स पनवेल येथून एकूण 39 पर्यटक जम्मू कश्मीर पर्यटनासाठी गेले होते. त्यापैकी या तिघांचा समावेश आहे. श्रीनगर येथे हॉस्पिटलमध्ये एयरलिफ्ट करून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. उर्वरित पर्यटक सुखरूप असल्याची माहिती पनवेल पोलिसांनी दिली आहे. पनवेल मधील निसर्ग ट्रॅव्हलचे मालक ओक यांच्या कडून देखील पनवेल शहर पोलिसांनी खात्री केली आहे. दरम्यान निसर्ग ट्रॅव्हलच्या माध्यमातून पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी पनवेल शहर पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती.आपले नातेवाईक सुरक्षित आहेत की नाही अशी चिंता सर्व नातेवाईकांना सतावत होती. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील पोलिस ठाण्यात धाव घेत जखमी व मृत पावलेल्या पर्यटकांची माहिती घेतली.
पेहलगाम हल्ल्यात पनवेलच्या दिलीप देसले यांचा मृत्यू, दोन जण जखमी
By वैभव गायकर | Updated: April 23, 2025 02:06 IST