शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

महापे आदिवासी पाड्यात पालिकेची डिजिटल शाळा; बोलक्या भिंतींची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2020 11:32 PM

गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न

नवी मुंबई : महापे येथील अडवली भुतावली या आदिवासी पाड्यातील नवी मुंबई महापालिकेची शाळा क्र मांक ४१ ही संपूर्ण डिजिटल करण्यात आली आहे. शाळेच्या इमारतीसाठी तसेच डिजिटल क्लासरूम बनविण्यासाठी सीएसआर फंड आणि आमदार निधीचा वापर करण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्र मानुसार बोलक्या भिंतींची निर्मिती करण्यात आली आहे.

महापे येथील अडवली भुतावली या आदिवासी पाड्यात १९६२ साली स्थापन झालेली जिल्हा परिषदेची कौलारू आणि पत्र्याची शाळा होती. महापालिकेच्या माध्यमातून या शाळेत बालवाडी ते आठवीपर्यंतचे वर्ग चालविले जात आहेत. सद्य:स्थितीत या शाळेत आदिवासी समाजातील ४० टक्के विद्यार्थी शिक्षण घेत असून परिसरात राहणारी हिंदी भाषिक नागरिकांची ६० टक्के मुले शिक्षण घेत आहेत. एमआयडीसी भागातील कंपन्यांच्या सीएसआर फंडातून शाळेसाठी मोठा निधी प्राप्त झाला आहे. मुंबई येथील एम्पथी फाउंडेशन यांच्या माध्यमातून ६५ लाख रुपयांचा निधी खर्च करून शाळेची दोन माजली प्रशस्त इमारत बांधून देण्यात आली आहे. दरवर्षी या शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी तीन हजार वह्यांचे वाटप केले जाते.

शाळेचे कार्यालय आणि वर्गखोल्यांमध्ये टेबल आणि खुर्च्या तसेच ५० इंचांचा एलईडी टीव्हीदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय सुलेखनकार अच्युत पालव यांच्या माध्यमातून वर्गखोल्यांमधील भिंतींवर अभ्यासक्रमानुसार बोलक्या भिंतीची निर्मिती करण्यात आली आहे. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी १०० स्मार्ट बेंचदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर नैतिक मूल्यांकन आणि मूल्यशिक्षणदेखील देण्यात येते.अडवली भुतावली येथील महापालिकेची शाळा क्र मांक ४१ ही संपूर्ण डिजिटल आहे. विद्यार्थ्यांचा पट वाढावा तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. गरीब कुटुंबातील विद्यार्थी तसेच कचरावेचक मुलांनीदेखील शिक्षण घ्यावे यासाठी पालकांमध्ये जागृती करण्यात येते. गरीब कुटुंबातील विद्यार्थी कुपोषित राहू नयेत यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना महिन्याला पाच किलो धान्य दिले जाते. महापालिका शाळेमध्ये राबविण्यात येणारे उपक्र म आणि डिजिटल शाळेमुळे परिसरातील खासगी शाळेतील विद्यार्थीदेखील महापालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश घेत आहेत. - भिकाजी सावंत (मुख्याध्यापक)वृक्षसंगोपन आणि पर्यावरणाचा संदेशशाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी विविध फळझाडे आणि फुलझाडे लावली आहेत. त्यांचे संवर्धन आणि संगोपन विद्यार्थी करतात. सदर शाळा निसर्गरम्य बनविण्यात आली असून यामुळे नैसर्गिक बटरफ्लाय गार्डन तयार झाले आहे. या ठिकाणी येणाऱ्या विविध पक्ष्यांसाठी पाण्याची सोयदेखील करण्यात आली आहे. शाळेच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या गार्डनमुळे वृक्षसंगोपन आणि पर्यावरणाचा संदेश दिला जातो. यासाठी वृक्षप्रेमी शिक्षक महेंद्र भोये, आदी शिक्षक आणि विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.

स्वच्छ आणि सुंदर शाळाअडवली भुतावली शाळेने कोपरखैरणे विभागातून सलग तीन वर्षे स्वच्छ आणि सुंदर शाळेचे प्रथम क्र मांकाचे पारितोषिक पटकावले असून नवी मुंबई विभागातून दुसरा क्र मांक पटकावला आहे.

टॅग्स :digitalडिजिटलSchoolशाळा