शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

डायल ११२ : मदतीला धावण्यात नवी मुंबई पोलिस दुसरे; मीरा भाईंदरची राज्यात आघाडी

By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 14, 2023 16:15 IST

मीरा भाईंदर सर्वसाधारण साडेपाच मिनिटाच्या आत मदतीला धावून जात आहेत.

नवी मुंबई : नागरिकांना मदतीसाठी सुरु करण्यात आलेल्या ११२ या हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या तक्रारीला रिस्पॉन्स देण्यात नवी मुंबईपोलिस राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहेत. काही महिन्यांपूर्वी १४ मिनिटांवर असलेला त्यांचा रिस्पॉन्स टाइम पाच ते सहा मिनिटांवर पोहचला आहे. तर मीरा भाईंदर सर्वसाधारण साडेपाच मिनिटाच्या आत मदतीला धावून जात आहेत. 

राज्यात सुरु करण्यात आलेली ११२ हेल्पलाईन येत्या काळात संपूर्ण देशासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे हि हेल्पलाईन अधिकाधिक प्रभावी व्हावी व गरजूंना त्याद्वारे मदत मिळावी यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. त्यानुसार हेल्पलाईनवर तक्रार मिळताच कमीत कमी वेळेत पोलिसांची मदत त्यांच्यापर्यंत पोहचली पाहिजे यावर भर दिला जात आहे. त्यानुसार मागील वर्षभराचा आढाव्यात नवी मुंबई पोलिस दुसऱ्या क्रमांकावर मजल मारू शकले आहेत. हेल्पाईन सुरु झाली तेंव्हा १४ मिनिटावर असलेला रिस्पॉन्स कालावधी कमी करून तो ५ ते ६ मिनिटावर पोहचला आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिस राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहेत. प्रथम क्रमांकावर मीरा भाईंदर पोलिस असून त्यांचा रिस्पॉन्स टाईम हा साडेपाच मिनिटाहून कमी आहे. तर पहिल्या दहामध्ये नवी मुंबई पोलिसांनंतर औरंगाबाद शहर, नाशिक शहर, ठाणे शहर, सोलापूर शहर, नागपूर शहर, अमरावती शहर, पिंपरी चिंचवड व दहाव्या क्रमांकावर पुणे शहर पोलिस आहेत. त्यांचा रिस्पॉन्स कालावधी हा साडेबारा मिनिटाचा आहे. ग्रामीण व शहरी भागात रिस्पॉन्स टाईम मध्ये अंतर असल्याचे कायदा व सुव्यवस्था अपर पोलिस महासंचालक कुलवंत सरंगल यांनी सांगितले. भौगोलिक दृष्ट्या शहरी भागाचे अंतर कमी असते. त्यामुळे कमीत कमी वेळेत पोलिस एखाद्या ठिकाणी पोहचू शकतात. मात्र ग्रामीण भागातली गावे दूर दूरवर असतात. त्यामुळे तिथपर्यंत पोहचहयला पोलिसांना काहीसा जास्त कालावधी लागतो. त्यानंतर देखील हा रिस्पॉन्स टाईम कमी कसा करता येईल यावर अभ्यास सुरु असल्याचेही त्यांनी वाशी येथे सांगितले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदर