शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

महापालिकेमुळे पनवेलचा विकास!

By admin | Updated: May 31, 2016 03:24 IST

महानगरपालिकेमुळे प्रस्तावित विमानतळाप्रमाणे पनवेल तालुक्याच्या विकासाचेही उड्डाण होणार आहे. १७९ चौरस किलोमीटर परिसरातील नगरपालिका, सिडको कार्यक्षेत्र व ६८ गावांचा समावेश आहे

नामदेव मोरे, नवी मुंबई महानगरपालिकेमुळे प्रस्तावित विमानतळाप्रमाणे पनवेल तालुक्याच्या विकासाचेही उड्डाण होणार आहे. १७९ चौरस किलोमीटर परिसरातील नगरपालिका, सिडको कार्यक्षेत्र व ६८ गावांचा समावेश आहे. सद्यस्थितीमध्ये या परिसरामध्ये ८३ कोटी ९८ लाख रूपये मालमत्ता व इतर कर उपलब्ध होत असून महापालिका अस्तित्वात आल्यानंतर हे उत्पन्न कित्येक पटीने वाढणार आहे. राज्यातील पहिली नगरपालिका असणाऱ्या पनवेल शहर व तालुक्यातील गावे एकत्रित करून महापालिका बनविण्यात यावी, अशी मागणी १९९१ मध्ये सर्वप्रथम करण्यात आली होती. २५ वर्षांनंतर महापालिकेचे स्वप्न प्रत्यक्ष साकार होत आहे. पनवेल परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ व प्रस्तावित महापालिका यामुळे विकासाचेही उड्डाण होणार आहे. सद्यस्थितीमध्ये शहरामध्ये नगरपालिका, गावांमध्ये ग्रामपंचायत, तालुक्यात जिल्हा परिषद, विकसित नोडमध्ये सिडको विकासकामे व कर संकलन करत आहे. निधीचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे विकासाला गती येत नव्हती. महापालिकेमुळे सर्व निधी एका ठिकाणी संकलित होणार आहे. निधी उपलब्ध झाल्याने विकास कामेही वेगाने करणे शक्य होणार आहे. सद्यस्थितीमध्ये नगरपालिका क्षेत्रामध्ये ३३ कोटी ४२ लाख ६५,८८३ रूपये मालमत्ता व पाणीकर रूपाने उपलब्ध होत आहेत. सिडको कार्यक्षेत्रामधील २१ गावांमध्ये ३१ कोटी ४० लाख ५९ हजार ४१६ रूपये कर वसूल होणार आहे. नैना परिसरातील ३६ गावांमध्ये १५ कोटी ३९ लाख रूपये कर वसूल होत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या ११ गावांचे उत्पन्न ३ कोटी ७६ लाख ५७७३ रूपये उत्पन्न मिळत आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व गावे व नगरपालिकेमध्ये ८३ कोटी ९८ लाख रूपये कर वसूल होत आहे. महापालिका क्षेत्रातील सद्यस्थितीमध्ये सर्वाधिक महसूल नगरपालिका क्षेत्रातील आहे. ६८ गावांपैकी खारघर व बेलपाडा परिसराचे उत्पन्न सर्वाधिक १३ कोटी २९ लाख रूपये आहे. नियोजनासाठी एकच प्राधिकरण येणार असल्यामुळे उत्पन्नाचे इतरही मार्ग उपलब्ध होणार आहेत.