शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
6
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
7
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
8
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
9
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
10
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
11
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
12
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
13
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
14
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
15
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
16
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
17
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
18
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
20
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार

नैनाच्या आराखड्यावर विकासकांचा आक्षेप

By admin | Updated: October 19, 2015 01:28 IST

नैना क्षेत्राच्या विकासासाठी सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्याचा विकास आराखडा संपूर्ण प्रक्रियेनंतर अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

नवी मुंबई : नैना क्षेत्राच्या विकासासाठी सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्याचा विकास आराखडा संपूर्ण प्रक्रियेनंतर अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. असे असले तरी सिडकोने पाठविलेल्या या विकास आरखड्यावर नैना क्षेत्रातील विकासकांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. नागरिकांच्या सुचना व हरकतीला फाटा देत सिडकोने मनमानी पध्दतीने आराखडा व नियमावली तयार केल्याचा आरोप विकासकांनी केला आहे.नैना क्षेत्राच्या विकासासाठ सिडकोने २३ गावांचा पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आहे. त्यानुसार विकास आराखडा व नियमावली तयार करून त्याच्यावर नागरिकांच्या सुचना व हरकती मागविण्यात आल्या. या सुचना व हरकतीवर सुनावणी घेवून आवश्यक दुरूस्त्यांसह विकास आराखड्यांचा मसुदा अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र शासनाकडे पाठविलेला या विकास आराखड्यात नागरिकांच्य एकाही सुचनेचा विचार केला नसल्याचे विकासकांचे म्हणणे आहे. एकूणच सिडकोने मनमानी पध्दतीने हा विकास आराखडा तयार केल्याचा आरोप नैना बिल्डर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांनी केला आहे. दरम्यान, विकास आराखड्याचा अंतिम मसुदा तयार करताना सिडकोने कोणत्या सुचना स्वीकारल्या व कोणत्या नाकारल्या याची माहिती संबधितांना मिळावी व त्यांना पुन्हा आपले म्हणणे मांडता यावे, यासाठी नियमानुसार ३0 दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत उद्या संपत असल्याने नैना क्षेत्रातील विकासक नगरविकास संचालकांकडे यासंदर्भातील आपला आक्षेप नोंदविणार असल्याची माहिती बाविस्कर यांनी दिली. (प्रतिनिधी)