शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विकासकाची गोळ्या झाडून हत्या नेरूळमधील घटना : भररस्त्यात कार अडवून झाडल्या गोळ्या

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 15, 2023 18:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : विकासकाची कार अडवून गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. बुधवारी संध्याकाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : विकासकाची कार अडवून गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. बुधवारी संध्याकाळी ते नेरूळमधून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांची कार अडवून चार गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांचा जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे. 

नेरुळ सेक्टर ६ येथे बुधवारी पाच वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. बेलापूरला राहणारे विकासक शावजी भाई पटेल (५०) हे कामानिमित्ताने नेरुळला आले होते. ४.४५ च्या सुमारास ते नेरुळ सेक्टर ६ येथून जात असताना मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांची कार अडवली. यानंतर त्यांच्यावर चार राऊंड गोळ्या झाडून तिथून पळ काढला. यामध्ये पटेल यांचा जागीच मृत्यू झाला असून घटनेवेळी ते कारमध्ये एकटेच होते. घटनेची माहिती मिळताच  पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह आयुक्त संजय मोहिते, गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे, उपायुक्त विवेक पानसरे यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

व्यावसायिक वादातून त्यांची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. यासंदर्भात त्यांच्या कुटुंबीयांकडे पोलिसांनी चौकशी देखील केली आहे. तर घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांची माहिती मिळवली जात आहे. त्यासाठी गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांची दहा पथके तयार करण्यात आली आहेत. त्याद्वारे लवकरच गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून हत्ये मागच्या मूळ कारणाचा उलगडा केला जाईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

मागील काही दिवसांपासून पोलिसांकडून नवी मुंबईतली गुन्हेगारी थोपवण्याचा प्रयत्न होत असतानाच हि घटना घडली आहे. गतवर्षी घणसोलीत देखील अशाच प्रकारे एका विकासकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे रियल इस्टेट क्षेत्रातली गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान या घटनेच्या माध्यमातून पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस