शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर सगळं संपलं; ३ वर्षे दिवसरात्र खुर्चीवर बसून काढणाऱ्या इंजिनिअरची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 20:23 IST

नवी मुंबईत एका व्यक्तीने तीन वर्षे स्वतःला घरात कोंडून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

नवी मुंबईतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नवी मुंबईत ५५ वर्षीय व्यक्तीने गेल्या ३ वर्षांपासून नैराश्यामुळे स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते. ही व्यक्ती पूर्वी कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणून काम करत होती. खोलीत कोंडून घेतलेल्या या व्यक्तीच्या आईवडीलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता आणि त्याच्या मोठ्या भावाने २० वर्षांपूर्वी आत्महत्या केली. यामुळे त्यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती. ही व्यक्ती फक्त ऑनलाइन जेवण ऑर्डर करून बाहेरील जगाशी संपर्क साधत होती. मात्र एका सामाजिक संस्थेला याबाबतची माहिती मिळताच त्यांनी या व्यक्तीला गाठलं आणि मदत केली.

नवी मुंबईच्या घणसोलीतील सेक्टर २४ मध्ये राहणाऱ्या अनुप नायर यांनी आई वडील आणि भावाच्या मृत्यूनंतर आलेल्या नैराश्यातून तीन वर्षांपेक्षा जास्त काळ स्वतःला घरात कोंडून ठेवलं होतं. अनुप नायर हे पेशाने इंजिनियर होते. मात्र आई वडील आणि भावाच्या मृत्यूनंतर ते एकटे पडले. जेव्हा एका स्वयंसेवी संस्थेला त्याच्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी अनुप नायर यांच्या घरी पोहोचून त्यांना कोंडीतून सोडवलं.

अनुप नायर यांच्या कुटुंबात आता कोणीही उरलेलं नाही. त्यांची आई पूनम्मा नायर भारतीय हवाई दलाच्या दूरसंचार विभागात काम करत होती, तर त्यांचे वडील व्हीपी कुट्टी कृष्णन नायर टाटा हॉस्पिटलमध्ये काम करत होते. ६ वर्षांपूर्वी दोघांचेही निधन झाले. त्यांच्या मोठ्या भावाने २० वर्षांपूर्वी आत्महत्या केली. या दुःखद घटनांनी अनुप हे नैराश्यात ढकलले गेले.

या काळात अनुप नायर कोणालाही भेटले नाहीत. त्यांचा फक्त ऑनलाइन फुड डिलिव्हरी करणाऱ्यांसोबत बाहेर पुरता संबंध होता. ते कधीही घराबाहेर पडले नाही. त्यांनी कधीही घराच्या बाहेर कचरा फेकला नाही. नायर राहत असलेल्या इमारतीमधील लोकांनी सांगितले की ते त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा क्वचितच उघडत असे. ते घरातील कचराही बाहेर काढत नसे, त्यामुळे इमारतीतील सदस्यांना कधीकधी त्याला कचरा बाहेर फेकण्यासाठी सांगावे लागत असे.

माहिती मिळाल्यानंतर एसईएएल नावाच्या संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा फ्लॅटची अवस्था पाहून त्यांना धक्का बसला. रातील बहुतेक फर्निचर गायब झाल्यामुळे नायर फक्त खुर्चीवर झोपत असे. त्यांच्या पायांनाही गंभीर संसर्ग झाला होता. यासाठी त्वरित उपचारांची आवश्यकता होती. त्यांच्या पालकांच्या मृत्यूनंतर काही नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण अनुप कोणावरही विश्वास ठेवत नव्हते.

दरम्यान, नायर यांना पनवेलमधील एका आश्रमात ठेवण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार केले जात आहे. "आता माझे कोणतेही मित्र नाहीत, माझे कुटुंब आधीच निघून गेले आहे. माझी तब्येत इतकी खराब आहे की मला नवीन नोकरीही मिळत नाही," असं नायर म्हणतात. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस