अंबरनाथ : दीड ते दोन वर्षापासून वादात सापडलेल्या अंबरनाथ येथील गार्डियन डेंटल कॉलेजवर पुन्हा एकदा संक्रात आली आहे. या महाविद्यालयाच्या इमारतीची बांधकाम परवानगी कायमस्वरूपी रद्द केल्याने हे महाविद्यालय पुन्हा बंद होणार आहे. ज्या जागेवर ही इमारत उभारण्यात आली आहे, त्या जागेचे खोटे दस्तावेज सादर करून ही बांधकाम परवानगी मिळविण्यात आली होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
शान एज्युकेशन सोसायटीच्या गार्डियन डेंटल कॉलेजसह संस्थेचे अध्यक्ष अफान रशीद शेख व त्यांच्या सहका:यांनी हे दंत महाविद्यालय उभारण्यासाठी पालिकेकडे खोटी कागदपत्रे सादर करून बांधकाम परवानगी मिळवली होती. ज्या जागेवर महाविद्यालय उभारण्यात आले आहे, ती जागा रामचंद्र तुकाराम म्हात्रे यांच्या मालकीची होती. संबंधित जागेचा पूर्ण मोबदला न देताच संस्थेने या शेतक:यांची जागा हडपली. एवढेच नव्हे तर खोटे दस्तावेज तयार करून या जागेवर महाविद्यालयासाठी इमारत बांधण्याची परवानगी मिळवली. हा प्रकार उघड झाल्यावर सप्टेंबर 2क्13 मध्ये संस्थेच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली होती. तसेच महाविद्यालयाची परवानगीही रद्द करण्यात आली होती.
या महाविद्यालयात शिकणा:या सर्व विद्याथ्र्याना दुस:या महाविद्यालयात पाठविण्यात आले. मात्र, संस्थाचालकांनी या सर्व प्रकारातून कोणताही बोध न घेता पुन्हा हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी परवानगी मिळवत चालू वर्षात विद्याथ्र्याना प्रवेशही दिला. एकीकडे चुकीच्या पद्धतीने महाविद्यालय चालविणो आणि दुसरीकडे इमारतीच्या बांधकामासाठी खोटे दस्तावेज सादर करणो, अशा कचाटय़ात हे महाविद्यालय सापडले आहे.
महाविद्यालयाच्या या फसव्या कामकाजाची तक्रार नगरसेवक मनोहर वारिंगे आणि पंढरीनाथ वारिंगे यांनी पालिकेकडे केली होती. तसेच या महाविद्यालयाची बांधकाम परवानगी कायमची रद्द करण्याची मागणी केली. या तक्रारीवरून अंबरनाथ पालिकेने या महाविद्यालयाला तीन वेळा नोटीस बजावत आपली बाजू मांडण्याची संधी दिली.
संस्थेने आपली बाजू न मांडल्याने अंबरनाथ पालिकेने अखेर या महाविद्यालयाच्या इमारतीची परवानगी रद्द केली आहे. त्यामुळे आता या महाविद्यालयाची कायमची दातखीळ बसली आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थी - पालकांची फसवणूक
4गार्डियन डेंटल कॉलेजने एकदा नव्हे तर दुस:यांना विद्याथ्र्याची फसवणूक केली आहे. याआधीही महाविद्यालयाची परवानगी रद्द झाल्यावर विद्याथ्र्याना दुस:या महाविद्यालयात हलविण्यात आले होते.
4या चुकीतून कोणताही बोध न घेता 2क्13-14 या शैक्षणिक वर्षासाठी पुन्हा प्रवेश देत विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक केली आहे. या प्रवेश प्रक्रियेला महाराष्ट्र शासनाच्या प्रवेश नियंत्रण समितीची परवानगी नाही. त्यामुळे दुस:यांदा विद्याथ्र्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.