शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:17 IST

कार्यकर्त्यांची सरकारविरोधात घोषणाबाजी

नवी मुंबई : बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संताप व्यक्त करीत असून, नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी वाशीतील शिवाजी चौकात निदर्शने केली. या वेळी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.बँक घोटाळाप्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह ७0जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याने सरकार सूडबुद्धीने राजकारण करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या वेळी नवी मुंबई राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीत सरकारच्या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गावडे यांनी राज्यात सरकारची चुकीच्या दिशेने पावले पडत असून काही दिवसांपूर्वी काही लोकांनी पक्षांतर करून राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्याचे काम केल्याचा आरोप केला. गेल्या २५ वर्षांपासून शिखर बँकेच्या चौकशीत शरद पवार यांचे नाव नव्हते याबाबत भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण देखील दिले असताना हेतूपुरस्सरपणे पवारांचे नाव जोडले जात असल्याचे ते म्हणाले.सरकारची हुकूमशाही सुरू असून याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. या वेळी नवी मुंबई राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जी.एस.पाटील, प्रदेश सरचिटणीस भालचंद्र नलावडे, अफसर इमाम, युवक अध्यक्ष राजेश भोर, रंगनाथ प्रभू, अशोक सूर्यवंशी, नवी मुंबई महिला अध्यक्षा रोहिणी घाडगे, नगरसेविका सपना गावडे, तालुका अध्यक्ष महादेव पवार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.उरणमध्येही निदर्शनेउरण : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने गुन्हा दाखल केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. कार्यकर्त्यांनी उरणमधील गांधी चौकात सत्ताधारी व ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी देत निषेध केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष प्रशांत पाटील, भावना घाणेकर, पुखराज सुतार, मनोज भगत आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस