शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

रिक्षांच्या अनियंत्रित वाढीचा ताप, परवाने थांबवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 07:06 IST

शहरात वाहतुकीचा बोजवारा उडवण्यास वाहनचालकांचा बेशिस्तपणा कारणीभूत ठरत आहे. त्यामध्ये दुचाकीस्वारांसह रिक्षाचालकांचा सर्वाधिक समावेश दिसून येत आहे; परंतु आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाया होऊनदेखील त्यांना शिस्तीचे वळण लागलेले नाही.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : शहरात वाहतुकीचा बोजवारा उडवण्यास वाहनचालकांचा बेशिस्तपणा कारणीभूत ठरत आहे. त्यामध्ये दुचाकीस्वारांसह रिक्षाचालकांचा सर्वाधिक समावेश दिसून येत आहे; परंतु आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाया होऊनदेखील त्यांना शिस्तीचे वळण लागलेले नाही. यामुळे वाढती वाहनसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी परमिट थांबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबईपुढे वाहतूककोंडीचे आव्हान निर्माण झाले आहे. अगोदरच शहरातील मुख्य रस्ते अरुंद असताना, त्यावरून धावणाºया वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने अधिक कोंडी होत आहे. अशा वेळी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहन चालवणाºया बेशिस्त चालकांमुळे ठिकठिकाणी समस्या उद्भवत आहेत. त्यामध्ये रिक्षाचालकांचे प्रमाण सर्वाधिक दिसून येत आहे. उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करणारे प्रामाणिक रिक्षाचालक वगळता इतरांमध्ये मुजोरपणा दिसून येतो. सिग्नल लागल्यानंतर इतर वाहने झेब्रा क्रॉसिंगच्या अगोदर थांबली असतानाही, रिक्षा मात्र त्यापेक्षाही अधिक पुढे थांबल्याचे पाहायला मिळते. शहरातील प्रत्येक चौक व सिग्नलच्या ठिकाणी हे दृश्य पाहायला मिळू शकते.सद्यस्थितीला आरटीओच्या नोंदीनुसार शहरात १७ हजार अधिकृत रिक्षा धावत आहेत. मात्र, मागील काही वर्षांपासून अनधिकृत रिक्षांचेही प्रमाण वाढले असून, ते दोन हजारांच्या घरात असल्याचे समजते. यापैकी बहुतांश रिक्षा जास्त रहदारी असलेल्याच मार्गावर चालवल्या जातात. अशा वेळी देखील प्रवाशांना त्यांच्या मनमर्जी भाड्याचा त्रास सहन करावा लागतो. अनेक वर्षे परमिट बंद असल्याने इतर शहरातल्या भंगारातील रिक्षा नवी मुंबईत आणून चालवल्या जात आहेत. त्या चालवणाºयांमध्ये परप्रांतीयांसह काही स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा समावेश आहे. आरटीओकडून निश्चित केलेल्या थांब्याव्यतिरिक्त जागोजागी त्यांनी विनापरवाना थांबे तयार केले आहेत. त्यापैकी बहुतांश थांबे एनएमएमटीच्या बस थांब्याच्या जागीच आहेत. प्रामाणिक रिक्षाचालकांना दमदाटी करणे, ठरावीक मार्गावर इतर रिक्षाचालकांना बंदी घालणे, असे प्रकार त्यांच्याकडून होतात. रिक्षांचे प्रमाण वाढल्यास स्पर्धा वाढून वाद उद्भवण्याची शक्यता आहे. परिवहन विभागाने परमिट खुले केल्यापासून मागील दोन वर्षांत नवी मुंबई आरटीओकडे नव्या ५२९० रिक्षांची नोंद झाली आहे. २०१६ मध्ये २३७० तर २०१७मध्ये २९०९ रिक्षांना परमिट वाटप झाले आहे.शहराअंतर्गत ये-जा करण्यासाठी एनएमएमटी, बेस्ट, रेल्वे हा सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय असतानाही रिक्षाला अधिक महत्त्व दर्शवले जात आहे. यामुळे रिक्षाचालक संघटनांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. त्यांच्याकडून आरटीओ, वाहतूक पोलीस यांच्याकडून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा फास आवळताच, दबाव आणला जातो. त्यामुळे अनियंत्रित रिक्षांचा प्रवाशांसह शासकीय अधिकाºयांनाही ताप होऊ लागला आहे.सर्वाधिक रिक्षा ठरावीकच मार्गावर चालवल्या जातात. त्यामध्ये वाशी कोपरखैरणे, ऐरोली स्थानक ते ऐरोली नाका, नेरुळ स्थानक ते सारसोळे गाव, कोपरखैरणे स्थानक ते डी-मार्ट चौक, घणसोली स्थानक ते घणसोली गाव, सीबीडी स्थानक ते आर्टिस्ट व्हिलेज या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. या मार्गावर रस्त्यावर धावणाºया वाहनांमध्ये रिक्षाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यांच्याकडून भाडे मिळवण्याच्या प्रयत्नात प्रवासी हात दाखवेल तिथेच रिक्षा थांबवली जाते. या प्रकारामुळे जागोजागी वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे.रिक्षाचे परमिट वाटप करताना खासगी वाहनांप्रमाणेच पार्किंगची सोय पाहणे गरजेचे झाले आहे; परंतु शासनाकडून अद्यापपर्यंत प्रभावीपणे ही यंत्रणा राबवली जात नाहीये. त्यामुळे पार्किंगची सोय आहे की नाही, याची चौकशी न करताच परवाने दिले जात आहेत. परिणामी, अशी वाहने रस्त्यावर उभी होत असल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.शहरात वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रस्त्यावरील वाहनांमध्ये रिक्षाचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळे भविष्यातील वाढती वाहतूककोंडी टाळण्यासाठी रिक्षांचे परमिट थांबवणे, तसेच खासगी वाहनांच्या पार्किंगची चौकशी होणे गरजेचे आहे.- प्रशांत म्हात्रे, रहिवासी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई