शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता कर माफ करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:10 IST

जवळपास ३५८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. नागरिकांध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

नवी मुंबई : कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर एक आठवड्यात लॉकडाऊन सुरू झाला. साडेतीन महिने नवी मुंबईमधील प्रमुख उद्योग बंद आहेत. नागरिकांना रोजगार नाही. जवळील शिल्लक असलेले पैसे संपले आहेत. घराचे व इतर कर्जांचे हप्ते भरता आलेले नाहीत. १२ हजारपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

जवळपास ३५८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. नागरिकांध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरवासीयांना महानगरपालिकेने सहकार्य केले पाहिजे. सद्य:स्थितीमध्ये मनपा कार्यक्षेत्रात ३ लाख २७ हजार मालमत्ताधारक आहेत. यामधील ५५० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्ताधारकांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्यात यावा. ५५० चौरस फूटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ असणाऱ्यांनाही टक्केवारीप्रमाणे मालमत्ता व पाणी करामध्ये सूट देण्यात यावी, अशी मागणी विजय चौगुले यांनी केली असून याविषयी आयुक्तांना पत्र दिले आहे. नवी मुंबई राज्यातील श्रीमंत महानगरपालिका आहे. महानगरपालिकेला एएप्लस पथमानांकन लाभले आहे. मनपाच्या गंगाजळीत पुरेसे पैसे आहेत.

नवी मुंबईमधील नागरिकांनी दिलेल्या करामुळेच मनपा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहे. सद्य:स्थितीमध्ये शहरवासी संकटात आहेत. अशा परिस्थितीत महानगरपालिकेने करमाफी करून दिलासा द्यावा यासाठी त्यांनी आग्रह धरला आहे.नवी मुंबईमधील नागरिकांचे उत्पन्न ठप्प झाले आहे. कोरोनामुळे प्रत्येक व्यक्ती आर्थिक संकटात असून शहरवासीयांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता व पाणी दरात सूट देण्यात यावी.- विजय चौगुलेमाजी सिडको संचालक व विरोधी पक्ष नेत

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई