शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वाशीतील भूखंड गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 01:01 IST

नवी मुंबई शहराची निर्मिती झाल्यावर मार्केट देखील नवी मुंबई शहरात स्थलांतरित झाले होते.

नवी मुंबई : मुंबईतून स्थलांतरित झालेल्या व्यापाऱ्यांना नवी मुंबई शहरात गोदामे बनविण्यासाठी सिडकोने वाशी सेक्टर १९ येथे २0 वर्षांपूर्वी सवलतीच्या दरात भूखंड दिले होते. या भूखंडावर तब्बल १३ वर्षांनी बांधकाम करण्यात येणार असून या ठिकाणी व्यावसायिक संकुल उभे केले जाणार आहे. सदर इमारतींचे बांधकाम करण्यासाठी संबंधित सोसायटीने सिडकोला अंधारात ठेवून महापालिकेकडून बांधकाम परवानगी घेतली असल्याचा आरोप शिवसेना उपनेते तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा यांनी शुक्र वारी ५ जुलै रोजी सीबीडी येथे पत्रकार परिषदेत केला आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे सदर भूखंडाची किंमत सुमारे ९00 कोटी रु पये असून भूखंड हडपण्याचा प्रकार असल्याने या भूखंडाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.नवी मुंबई शहराची निर्मिती झाल्यावर मार्केट देखील नवी मुंबई शहरात स्थलांतरित झाले होते. मार्केटमधील व्यापाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सिडकोने वाशी सेक्टर १९ मधील भूखंड क्र मांक १ व ५ असे एकूण ४0 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड न्यू बॉम्बे मर्चंट्स कॉमन वेअर हाऊस लिमिटेड या संस्थेला सवलतीच्या दरात दिले होते. या भूखंडासाठी संस्थेने जमिनीची किंमत व दंडाच्या रकमेसह १५ कोटी सिडकोकडे जमा केले होते.सध्या या भूखंडाची रक्कम सुमारे ९00 कोटी रु पये असल्याचे नाहटा यांनी सांगितले. संस्थेच्या माध्यमातून सदर भूखंडावर आजपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यात आलेले नसून तब्बल १३ वर्षांनी सिडकोला अंधारात ठेवून महापालिकेकडून बांधकाम परवानगी घेतली असल्याचा आरोप त्यांनी केला. संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबईत स्थलांतरित झालेल्या ८६0 व्यापाºयांची नावे नमूद करण्यात आली असून यामध्ये शेकडो व्यापारी बोगस असल्याचा आरोप देखील नाहटा यांनी केला.भूखंडावर गेली २0 वर्षे बांधकाम न झाल्याने अनेक सदस्यांनी सदस्यत्व मागे घेतलेले असताना त्यांच्या जागी जे सदस्य घेण्यात आले आहेत ते संशयास्पद असल्याचे ते म्हणाले. सदर बाब गंभीर असून नवी मुंबईतील सर्वात मोठा भूखंड घोटाळा असल्याचा आरोप नाहटा यांनी केला.भूखंड हडप करण्याचा सदरचा कट असून त्याची शहानिशा करण्याची मागणी करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसात यावर योग्य कार्यवाही न झाल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यातआला आहे. या पत्रकारपरिषदेला जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे आदी उपस्थित होते.सत्ताधाºयांची मनमानीवर टीकाशहराची विकास नियंत्रण नियमावलीमुळे शहरातील विविध घटकांना लाभ होणार आहे. महापालिका प्रशासनाने विकास नियंत्रण नियमावलीचा आराखडा तयार केला असून देखील महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या दाबामुळे सदर विषय महासभेच्या पटलावर घेण्यात येत नसल्याचा आरोप नाहटा यांनी केला. नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून महापालिकेतील सत्ताधाºयांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देखील नाहटा यांनी दिला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई