शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पालिका मुख्यालयाच्या पायरीवर महिलेची प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 22:01 IST

रिक्षाचालकालाही हॉस्पिटल माहिती नाही.

- वैभव गायकर

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या पायरीवर एका महिलेची प्रसुती झाल्याची घटना शनिवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास घडली .अनीला समीर ठाक (२२) असे या महिलेचे नाव आहे .

     प्रसूतीच्या वेदना होत असल्याने अनिला आपल्या पतीसाठी जिल्हा रुग्णालयात येण्यास निघाले दरम्यान ज्या रिक्षाने त्या उपजिल्हा रुग्णालयात येण्यास निघाल्या त्या रिक्षा चालकाला पालिका रुग्णालयात रिक्षा घेऊन चला असे या ठाक दाम्पत्यांनी सांगितले .रिक्षा चालकाला देखील याबाबत स्पष्ट माहिती नसल्याने रिक्षा चालकाने रिक्षा थेट पालिका मुख्यालयाजवळ आणला दरम्यान मुख्यालयात उतरताच क्षणी पायऱ्यांवर चढताना अनिला ठाक यांच्या प्रसूती वेदना तीव्र झाल्याने काही क्षणातच अनीलाने पायरीवरच एका मुलीला जन्म दिला . मुख्यालयातील कर्मचारी व सुरक्षा रक्षकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला माहिती दिली .मात्र रुग्णवाहिकेतिल वाहन चालक जागेवर नसल्याचे समजले .यावेळी काही कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना याबाबत माहिती मिळताच डॉक्टर व परिचारिकेने घटनास्थळी धाव घेतली .

दरम्यान डॉक्टरांनी त्वरित जन्मलेल्या बाळाची नाळ कापून आई व बाळाला त्वरित रुग्णालयात हलविण्यास सांगितले . यावेळी पालिकेत सुरक्षा रक्षण म्हणून कार्यरत असलेल्या जीवन कोंडिलकर यांनी त्वरित आपल्या गाडीने नावजात मुलीला रुग्णालयात दाखल केले .मुलीच्या आईला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने त्वरित रिक्षाने उपजिल्हा रुग्णालायत दाखल केले .सध्याच्या घडीला माता बाळ दोघेही सुखरूप आहेत .महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी कुठेही रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी याकरिता शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा सुरु केली .मात्र उपजिल्हा रुग्णालयाच्या  हाकेच्या अंतरावर असलेल्या पालिका मुख्यालयात हि रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध होवू शकली नाही .रुग्णवाहिकेत वाहन चालकच रुग्णवाहिकेत उपस्थित नसल्याने हा प्रकार घडल्याने संबंधित वाहन चालकावर कारवाईची मागणी केली जात आहे .आम्ही त्वरित माता व बाळाला प्राथमिक उपचार सुरु केले आहेत . दोघांची तब्बेत उत्तम आहे .- डॉ नागनाथ यम्पल्ले ( वैद्यकीय अधीक्षक , उपजिल्हा रुग्णालय पनवेल )

टॅग्स :panvelपनवेल