शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

'कारखानदारीमुळे शेती क्षेत्रात घट, शेतीला आधुनिकतेची जोड देण्याची गरज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 09:09 IST

शरद पवार : शेतीवरील भार कमी व्हावा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नागरीकरण व कारखानदारीमुळे शेतीच्या क्षेत्रात घट होत आहे. शेतीवरील भार कमी केला पाहिजे. शेतीला आधुनिकतेची जोड देण्याची गरज असून, इतर व्यवसायाकडेही वळले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी नवी मुंबईत व्यक्त केले. 

मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्म संस्थेच्या माध्यमातून सानपाडामध्ये उभारलेल्या देशस्थ मराठा भवनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी यावेळी मुंबईतील गिरणी कामगार ते कृषी व्यापारातील बदलाचा आढावा घेतला. कृषी व्यापार नवी मुंबईमध्ये स्थलांतर केल्यानंतर त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यात व देशात फळ उत्पादन वाढविण्यासाठी सत्तेत असताना प्रयत्न केले. आता फळ उत्पादनामध्ये मोठी वाढ झाली आहे. देशात विकासकामे करण्यासाठी जमिनी संपादन कराव्या लागत आहेत. शहरीकरण वाढत आहे. कारखानदारी वाढत आहे. यामुळे शेतीसाठीची जमीन कमी होत आहे.  

माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, जुन्नर, आंबेगाव परिसरातील शेतकरी व नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी प्राधान्य दिले असून, यापुढेही सर्वांना सोबत घेऊन कामे करणार असल्याचे स्पष्ट केले. आमदार शशिकांत शिंदे यांनी बाजारपेठेच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.  आमदार अतुल बेनके यांनीही जुन्नर तालुक्यात कृषी पर्यटनाला चालना देणार असल्याचे स्पष्ट केले. समितीचे संचालक संजय पानसरे, संस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र नलावडे यांची भाषणे झाली. संस्थेचे अध्यक्ष राजन थोरवे, बाळासाहेब दांगट, आशाताई बुचके, अशोक हांडे, शंकर पिंगळे, चंद्रकांत ढोले, भगवान थोरात, महेश मुंढे, नामदेव भगत, बाळासाहेब सोळसकर, संदीप सुतार उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरी