शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नेव्हीत रुजू होण्यापूर्वीच तरुणाला मृत्यूने गाठले

By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 8, 2024 17:56 IST

उलवे येथे राहणाऱ्या समर्थ कराळे (१९) याचा नेरुळ येथे अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.

नवी मुंबई : एक महिन्यांनी नेव्हीत भरती होणार असलेल्या तरुणाचे अपघाती निधन झाले आहे. उलवेत राहणारा हा तरुण मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना त्याचा अपघात झाला. याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

उलवे येथे राहणाऱ्या समर्थ कराळे (१९) याचा नेरुळ येथे अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. त्याने नुकतेच मर्चंट नेव्हीचे प्रशिक्षण पूर्ण केले असून एक महिन्यांनी तो कामावर रुजू होणार होता. दरम्यान मंगळवारी रात्री तो मित्रांसह दुचाकीवरून बाहेर गेला होता. यानंतर मध्यरात्री दोन वाजता त्याने मॅसेज करून घरी येत असल्याचे सांगितले होते. परंतु पहाटे चार च्या सुमारास तो नेरुळ येथे ठाणे बेलापूर मार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला. यामुळे पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

उलवे येथे तो आईसह रहायला होता. तर घरची परिस्थिती बेताची असल्याने तो खासगी ठिकाणी नोकरी देखील करायचा. परिस्थितीवर मात करून तो मर्चंट नेव्हीत भरती झाला होता. मात्र कामावर रुजू होण्याच्या एक महिना अगोदरच त्याला मृत्यूने गाठले. त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यानुसार नेरुळ पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अपघातावेळी तो एकटाच त्याठिकाणी होता का ? त्याच्या सोबतचे मित्र कुठे होते ? याचाही अधिक तपास नेरुळ पोलिस करत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघात