शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
2
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
3
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
4
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
5
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
6
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
7
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
8
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
9
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
10
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
11
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
12
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
13
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
14
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
15
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
16
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
17
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
18
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
19
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
20
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

शंभर रुपयांत विकला जातोय मृत्यू; नवी मुंबईची तरुणाई ब्राऊन शुगरच्या आहारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 2:34 AM

मुंबईतून पुरवठा; कारवाईसाठी तीन पथके तैनात

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री सुरु असून त्यात ब्राऊन शुगरचाही समावेश असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक नोडमध्ये किमान १२ ते १५ जणांकडून त्याची विक्री होत असून तेदेखील नशेच्या आहारी गेलेले आहेत. त्यांच्याकडून महाविद्यालयीन तरुणांसह रिक्षाचालकांना या नशेची लत लावून ग्राहक वाढवले जात आहेत.शहरातील महाविद्यालयीन तरुण, झोपड्यांमधील रहिवाशी तसेच रिक्षाचालकांमध्ये नशेच प्रमाण अधिक दिसून येत आहे. त्यांच्याकडून केल्या जाणारया नशेसाठी वापरल्या जाणारया अमली पदार्थांमध्ये गांजासह एमडी पावडर व ब्राऊन शुगरचाही समावेश दिसून येत आहे. तर मागील काही महिन्यांपासून शहरात मोठ्या प्रमाणात ब्राऊन शुगरचीदेखील विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. शंभर रुपयांना एक पुडी विक्रली जात असून, नशा करणाऱ्यांमध्ये ती चिट्टी म्हणुन बोलली जात आहे. तर दहा चिट्टयांच्या पिशवीला पोटला हा शब्द वापरला जात आहे. चिट्टीची विक्री करणारयांना हा एक पोटला ६५०० ते ७००० रुपयांना मिळतो. यानंतर त्यांच्याकडून एका पोटल्यामागे तीन ते साडेतीन हजार रुपयांचा नफा मिळवण्यासाठी एक चिट्टी शंभर रुपयांना विकली जात असल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंगमध्ये समोर आले आहे. त्यानुसार सद्यस्थितीला प्रत्येक नोडमध्ये १० ते १२ जणांकडून या चिट्टीच्या विक्रीचा व्यवसाय केला जात असून त्यांचे रोजचे ग्राहक देखिल ठरलेले आहेत. त्यामद्ये रिक्षाचालकांसह महाविद्यायीन तरुणांचा सर्वाधिक समावेश दिसून येत आहे. त्यामद्ये कोपर खैरणे परिसरात सर्वाधिकजन हि नशा करत असल्याचे एकून परिस्थितीवरुन दिसून येत आहे. त्यांच्याकडून नशा करण्यासाठी महावितरणच्या उघड्या ट्रान्सफार्मर रुम तसेच मोकळी मैदाणे वापरली जात आहेत. अनेकदा ठरावीकजन एकत्र येवून त्याची नशा करतानाही आढळत आहेत. यावेळी नशेमध्ये त्यांच्याकडून हाणामारीच्याही घटना घडत आहेत.काही महिण्यांपुर्वी बोनकोडेतील एका तरुणाने मोठ्या प्रमाणात चिट्टीची विक्री सुरु करुन नफा कमवायला सुरवात केली होती. यादरम्यान तो देखिल नशेच्या आहारी गेल्याचे परिणाम दिसू लागल्यानंतर कुटूंबियांनी त्याला पुर्नवसन केंद्रात दाखल केले आहे. मात्र यानंतर त्याच्याकडून जी मुले चिट्टी विकत घ्यायची त्यांनीच विक्री सुरु केली असून मागील काही दिवसात त्यांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे शंभर रुपयांमध्ये विकत मिळणारया या मृत्यूच्या आहारी शहरातला तरूण वर्ग जात चालला आहे.मागील महिन्यांपासून पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अमली पदार्थ विरोधी मोहीम राबवली जात आहे. त्याकरिता विशेष पथक देखिल तयार करण्यात आले आहे. या पथका यापूर्वी यापुर्वी मोठ्या प्रमाणात गांजा व एमडी पावडर जप्त केला आहे.गुन्हेगारीला प्रोत्साहनसद्यस्थितीला शहरात मोठ्या प्रमाणात बोगस रिक्षा चालत असून, त्या चालवणारे तरून गुन्हेगारी प्रवृत्तीचे दिसून येत आहे. त्यांच्याकडून नशा करुनच रिक्षा चालवल्या जात आहेत. अशावेळी एखाद्या प्रवाशांसोबत अथवा इतर वाहनचालकांसोबत वाद झाल्यास त्यांच्याकडून नशेमध्ये जिवघेना हल्ला होत आहे.परंतु जागोजागी नाकाबंदीत वाहनांची झडाझडती होत असतानाही गर्दुले रिक्षाचालक त्यामधून कसे सुटतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे अमली पदार्थांची विक्री करणारयांविरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुसार यासंदर्भात पोलीसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही.नशेमध्ये कुटुंबीयांवरही हल्लेनशेच्या आहारी गेलेल्या तरुणांकडून चिट्टी खरेदीसाठी घरच्यांकडे पैशाचा हट्ट केल्यानंतर तो पुर्ण न झाल्यास आई वडिलांवर देखिल हल्ले होत आहेत. अशाच प्रकारातुन काही मुलांनी रात्रीच्या वेळी रस्त्यालगतच्या उभ्या वाहनांमधून पेट्रोल चोरीचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे कोपरखैरणेसह अनेक परिसरात सातत्याने पेट्रोल चोरीच्या घटना घडत आहेत.पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार संपुर्ण आयुक्तालयात तीन विशेष पथकांमार्फत अमली पदार्थ विरोधी कारवाया केल्या जात आहेत. त्यानुसार संपुर्ण आयुक्तालयात महिन्याभरात ५० हुन अधिक कारवाया झाल्या आहेत. तर ब्राऊन शुगरची देखिल विक्री होत असल्यास संबंधीतांचा शोध घेवून त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.- पंकज डहाणे, पोलीस उपआयुक्त.मस्जिद बंदर परिसरातून पुरवठामस्जिद बंदर परिसरात अम्मा नावाच्या एका महिलेकडून ब्राऊन शुगरची विक्री होत आहे. त्याठिकाणावरुन गरजेनुसार पोटला खरेदी केल्यानंतर रेल्वेमार्गेच तो नवी मुंबईत आनला जात आहे. या कामाकरिता काहींनी वेगळी मुले ठेवली असून त्यांना १०० ते २०० रुपये एका फेरिला याप्रमाणे पैसे मोजले जात आहेत.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ