शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

मृत बिबट्याचे मांस केले फस्त, पनवेलच्या मोर्बी धरणालगतच्या जंगलातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 17:24 IST

Navi Mumbai News : सर्वजण पालेखुर्द गावचे राहणारे आहेत. दिड महिन्यापूर्वी त्यांना जंगलात मृत बिबट्या आढळला होता.

ठळक मुद्देत्याला जंगलातील झोपडीत नेवून जबडा वेगळा करून कातडी व नखे काढण्यात आली. यानंतर त्यांनी जंगलातच झोपडीत बिबट्याचे मांस शिजवून खाल्ल्याचे तपासात समोर आल्याचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नवी मुंबई : मृत अवस्थेत आढळलेल्या बिबट्याचे कातडे व नखे काढून मांस फस्त केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पनवेल मधील मोर्बी धरण लगतच्या जंगलात हा प्रकार घडला आहे. त्यांचे इतर दोन साथीदार फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाचे पोलीस नाईक सचिन टाके यांना पनवेल मधील एका व्यक्तीकडे वाघनखे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर व सहायक निरीक्षक निलेश तांबे यांच्या पथकाने मोर्बी धरणालगतच्या जंगलातून दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांच्या पालेखुर्द येथील घरातून चार नखे व प्राण्याची कातडी आढळून आली. याबाबत वन विभागाला कळवले असता ती नखे व कातडी बिबट्याची असल्याचे उघड झाले. त्यानुसार गणपत पालकू लोभी (२६) व गणपत राघू वाघ (५५) यांना अटक करून त्यांच्या विरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे इतर दोन साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सर्वजण पालेखुर्द गावचे राहणारे आहेत. दिड महिन्यापूर्वी त्यांना जंगलात मृत बिबट्या आढळला होता.

त्याला जंगलातील झोपडीत नेवून जबडा वेगळा करून कातडी व नखे काढण्यात आली. यानंतर त्यांनी जंगलातच झोपडीत बिबट्याचे मांस शिजवून खाल्ल्याचे तपासात समोर आल्याचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अपर आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, उपायुक्त प्रवीणकुमार पाटील आदी उपस्थित होते. मृत बिबट्याचे मांस फस्त केल्यानंतर त्याची चार नखे व कातडी दोघांकडे ठेवली होती. तर जबडा व इतर नखे फरार असलेल्या दोघांकडे आहेत. बिबट्याचे कातडे, नखे तसेच जबडा विकण्याच्या प्रयत्न होता. परंतु मांस ताजे असल्याने त्यापासून येणाऱ्या दुर्गंधीमुळे त्यांनी ते स्वतःकडेच ठेवले होते. त्यांनी धरणालगत सापळा रचून या बिबट्याची हत्या केली असावी अशीही शक्यता पोलीस वर्तवत आहेत. 

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलpanvelपनवेलPoliceपोलिसleopardबिबट्या