शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीच्या टेरेसवरचा स्टंट बेतला जिवावर, दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 23:20 IST

एका इमारतीच्या छतावरून दुसऱ्या इमारतीच्या छतावर उडी मारण्याचा प्रयत्न मुलाच्या जीवावर बेतला आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई - एका इमारतीच्या छतावरून दुसऱ्या इमारतीच्या छतावर उडी मारण्याचा प्रयत्न मुलाच्या जीवावर बेतला आहे. कार्तिश नाडणकर (15) असे मृत मुलाचे नाव आहे. तो जुईनगर सेक्टर 24 येथील अजिंक्यतारा या चार मजली इमारतीमध्ये राहणारा आहे. कार्तिश याने यंदा दहावीची परीक्षा दिलेली आहे.शुक्रवारी रात्री त्याचा इमारतीच्या छतावरून खाली कोसळून मृत्यू झाला. यावेळी तो काही मुलांसमोर एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीच्या छतावर उडी मारण्याचा स्टंट करत होता, असे समजते. दरम्यान त्याने उडी मारल्यानंतर छताचा पत्रा तुटल्याने तो खाली कोसळला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेच्या काही वेळ अगोदर त्याने इमारतीखाली खेळणाऱ्या मुलांकडे क्रिकेटबद्दल विचारले होते. मात्र नुकतेच क्रिकेट बंद केल्याचे मित्रांनी सांगितल्यानंतर तो इमारतीच्या छतावर गेला होता. यामुळे त्याने स्टंट करण्याचा प्रयत्न केला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.विदेशात चालणारे अश्या जीवघेण्या स्टंट चे लोन सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुंबईत देखील पसरत चालले आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईत अशा प्रकारचे स्टंट करून त्याचे व्हिडीओ व्हायरल करण्यात आले होते. मात्र कोणतेही प्रशिक्षण नसताना मुलांकडून केले जाणारे असे स्टंट जीवघेणे ठरत आहेत. दरम्यान जुईनगर येथिल या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Deathमृत्यू