शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

दि.बा. पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ केवळ बॅनरवरच, पंतप्रधानांकडून नामकरणाची घोषणा न झाल्याने प्रकल्पग्रस्त संतप्त

By वैभव गायकर | Updated: October 8, 2025 21:33 IST

Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबतची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करतील अशी धारणा प्रकल्पग्रस्तांची झाली होती.त्या स्वरूपाचे बॅनर देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमानतळ परिसरात लावले होते.

- वैभव गायकरपनवेल - नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबतची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करतील अशी धारणा प्रकल्पग्रस्तांची झाली होती.त्या स्वरूपाचे बॅनर देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमानतळ परिसरात लावले होते. मात्र दिबांच्या कार्याची आठवण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यापलीकडे दिबांच्या नावाची घोषणाच झाली नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये मोठी नाराजी पसरली.

विशेष म्हणजे मोदींचे भाषण संपत असताना कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रकल्पग्रस्तांनी दिबांच्या नावाची घोषणाबाजी सुरु केली.राज्य शासनाने केलेला ठराव केंद्र देखील मान्य करील खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील याबाबत सकारात्मक असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिबा पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीला दि.3 रोजी दिले होते.दिबांचे नाव नक्की लागेल या आशेत संपूर्ण प्रकल्पग्रस्त असताना या उदघाट्नच्या कार्यक्रमात नामकरणाचा मुद्दा मागे पडला.

काही दिवसापासुन नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे भले मोठे होर्डिंग्स,गेट्स,बॅनर्स देखील प्रकल्पग्रस्तांमध्ये चर्चेचा विषय ठरत होते .दिबांच्या नावासाठी आजवर मानवी साखळी आंदोलन,चक्का जाम आंदोलन,उपोषणे,कार रॅली यांसारखे असंख्य आंदोलने झाली आहेत.महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा केलेला ठराव देखील त्यांना सरकार जाता जाता मागे घ्यावा लागला होता.हाच ठराव पुढे महायुती सरकार मध्ये आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आणि केंद्राकडे पाठवला.तब्बल तीन वर्ष होऊन देखील नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लागू शकले नाही.विमानतळाचे काम पूर्ण झाल्याशिवाय असे नामकरण करता येत नसल्याचे वारंवार नेते मंडळी सांगत असताना विमानतळाचे उदघाटन झाले.या उदघाटनाचा मोठा फौज फाटा आणि तयारी पाहता नामकरणासाठी पुन्हा नव्याने कार्यक्रम आयोजित केला जाईल याची शक्यता धूसर झाली आहे.

दिबांच्या सुपुत्राने अद्यापही अपेक्षा-दिबांचे नाव विमानतळाला देण्याबाबत जनभावना आहे.आज आम्हाला आशा होती कि याबाबत काही घोषणा होईल.मात्र पंतप्रधानांच्या भाषणात तशी हिंट देखील मिळाली नाही.मला आशा आहे सरकार दिबांच्या नावाबाबत निश्चितच विचार करेल अशी आशा दिबांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी व्यक्त केली.

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्याचे आश्वासन आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.मात्र आजच्या कार्यक्रमात त्याबाबत काहीच निर्णय झाला नाही.यामुळे मी व्यथित झालो आहे.पुढील काही दिवसात सर्वपक्षीय बैठक बोलावली जाईल.यापुढे आरपारची लढाई लढल्याशिवाय पर्याय नाही.- दशरथ पाटील(अध्यक्ष ,दिबा पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण समिती )

English
हिंदी सारांश
Web Title : D.B. Patil Airport Naming Delayed; Project Affected People Disappointed.

Web Summary : Project-affected people are disappointed as PM Modi didn't announce D.B. Patil's name for Navi Mumbai Airport during the inauguration. Despite assurances from state leaders and past movements, the naming remains unresolved, causing widespread discontent.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ