लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : केवळ आपल्याला पर्यटकांचे भाडे मिळाले नाही याच कारणास्तव दस्तुरी नाक्यावर घोड्यांचा व्यवसाय करणाऱ्या चौघांनी एका हातरिक्षा चालकाला मारहाण केली. याप्रकरणी चौघा घोडेवाल्यांवर मारहाण, तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घोडेवाला कैलास आखाडे,मनोज शिंगाडे,भागा आखाडे,आणि अनंत शिंगाडे या चारही आरोपींवर मारहाण, तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.२५ मे रोजी सायंकाळी दस्तुरी नाक्यावर पर्यटक उतरले असता त्यांना तीन किलोमीटर गावातील एका हॉटेलमध्ये येण्यासाठी हातरिक्षांची आवश्यकता होती. त्यानुसार त्यांनी हातरिक्षात सामान ठेवून बसल्यावर हातरिक्षा चालकास या चारही घोडेवाल्यांंनी केवळ आपल्याला भाडे न मिळाल्यामुळे बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून रिक्षा चालकाने घोडेवाला कैलास आखाडे, मनोज शिंगाडे, भागा आखाडे, अनंत शिंगाडे आरोपींंविरोधात पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल के ली. यानंतर२६ मे रोजी सकाळी चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर नेहमीच घोडेवाल्यांंकडून पर्यटकांची दिशाभूल होऊन त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळली जात आहे.घोड्याचे नवखे पर्यटक पाहून तीन ते चार हजार रु पये आकारले जात आहेत. मध्यंतरी जिल्हाधिकारी शीतल उगले आल्या असता त्यांच्याशीही उद्धट वर्तणूक केली होती. त्यावेळेस त्यांनी मुख्य रस्त्यावर घोड्यांना बंदी करावी असे सनियंत्रण समितीच्या बैठकीत सूचित केले होते.सध्या आम्ही दस्तुरी येथे तीन पोलीस डे-नाईटसाठी कार्यरत केलेले असून नागरी प्रशासनाने येथे पर्यटकांच्या माहितीसाठी ठोस उपाययोजना करून बंद केलेले माहिती केंद्र खुले केल्याशिवाय येथे कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही. जर आम्ही नियमांनुसार चाललो तर एकही घोडेवाला हा व्यवसाय करूच शकणार नाही. आम्ही कारवाईला सुरु वात केल्यास येथील मान्यवर मंडळी मध्यस्थी करतात त्यामुळे आमची द्विधा मन:स्थिती होते.- राजवर्धन खेबुडे, सहायक पोलीस निरीक्षक, माथेरानदस्तुरी प्रवेशद्वारावर पर्यटकांची दिशाभूल होऊ नये त्यांना घोड्यावर,हातरिक्षात अथवा पायी प्रवास करावयाचा असल्यास दर फलकांबाबत इत्थंभूत माहिती मिळण्यासाठी आॅडियो क्लिप बनवून त्याद्वारे माहिती देणार आहे. त्यासाठीच आम्ही प्रयत्नशील आहोत. यामुळे पर्यटक निश्चिंतपणे येऊन त्यांचा एकंदरीत प्रवास सुखकर होईल आणि येथील पर्यटनाला वाव मिळू शकेल.- प्रसाद सावंत, गटनेते, नगरपालिकायेथे मोलमजुरी करण्यासाठी आलेल्या हातरिक्षा मजुरांना नेहमीच दस्तुरी नाक्यावर अनेक कटू प्रसंगांना सामोरे जाऊन व्यवसाय करावा लागत आहे. त्यांना घोडेवाल्यांकडून कुठल्याही प्रकारे मारहाण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने डे-नाईट येथे असणे गरजेचे असून पर्यटकांची दिशाभूल थांबवली पाहिजे.- प्रकाश सुतार, उपाध्यक्ष, श्रमिक हातरिक्षा संघटना
दस्तुरी बनलेय लूटमार केंद्र
By admin | Updated: May 29, 2017 06:24 IST