शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने शेतीचे नुकसान, महामुंबईत कांदा दरात वाढ, गारपिटीचा फळांनाही फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 13:23 IST

Onion Prices : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठा फटका आहे. पावसाने कांद्याचेही मोठे नुकसान झाल्यामुळे मुंबईत बाजारभाव वाढले आहेत. द्राक्ष, स्ट्रॉबेरीसह इतर फळांचेही नुकसान झाले आहे, मात्र भाजीपाल्यांची आवक अजून सुरळीत आहे.

नवी मुंबई - अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठा फटका आहे. पावसाने कांद्याचेही मोठे नुकसान झाल्यामुळे मुंबईत बाजारभाव वाढले आहेत. द्राक्ष, स्ट्रॉबेरीसह इतर फळांचेही नुकसान झाले आहे, मात्र भाजीपाल्यांची आवक अजून सुरळीत आहे. पावसामुळे शेतीचे किती नुकसान झाले, याचा अंदाज पुढील काही दिवसांमध्ये येईल.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा कांदा पिकाला फटका बसला आहे. यामुळे मुंबईमधील आवक घटली. मंगळवारी ६२३ टन आवक झाली. गेल्या आठवड्यात कांदा प्रतिकिलो २८ ते ३८ रुपये दराने विकला जात होता. आता हे दर ३० ते ४६ रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ६० रुपयांवर गेला आहे. पुढील काही दिवस कांद्याची तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. 

पावसामुळे फळे खराब होण्याचे प्रमाण पुढील काही दिवस वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. कांदा व फळांच्या तुलनेत भाजीपाल्यांची आवक सुरळीत आहे. मंगळवारी ४८६ २९९७ टन भाजीपाल्यांची आवक झाली असून ४ लाख ९५ जुडींचा समावेश आहे.

नाशिकसह इतर ठिकाणी कांद्याचे नुकसान झाले. यामुळे मंगळवारी कांद्याच्या दरामध्ये वाढ झाली.    - किशोर ठिगळे, व्यापारी अवकाळी पावसाचा द्राक्ष, स्ट्रॉबेरी व इतर फळांना फटका बसला आहे. यामुळे फळे खराब होण्याची शक्यता आहे. - संजय पानसरे, संचालक, फळ मार्केटभाजीपाला मार्केटमध्ये आवक सुरळीत सुरू आहे. अवकाळी पावसाचा अद्याप आवकेवर खूप परिणाम झालेला नाही. गुजरात, मध्य प्रदेश व इतर ठिकाणावरूनही आवक होत आहे.    - शंकर पिंगळे, संचालक, भाजीपाला मार्केट

टॅग्स :onionकांदाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती