शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

सायबर सिटीला प्रदूषणाचा विळखा

By admin | Updated: September 10, 2015 00:05 IST

सुनियोजित शहर अशी ओळख असणाऱ्या नवी मुंबईभोवती प्रदूषणाचा विळखा घट्ट होत चालला आहे. हवेतील प्रदूषणामुळे शहरवासीयांना हृदय, फुप्फुसे व श्वसन यंत्रणेशी संबंधित आजार होण्याची

- नामदेव मोरे,  नवी मुंबईसुनियोजित शहर अशी ओळख असणाऱ्या नवी मुंबईभोवती प्रदूषणाचा विळखा घट्ट होत चालला आहे. हवेतील प्रदूषणामुळे शहरवासीयांना हृदय, फुप्फुसे व श्वसन यंत्रणेशी संबंधित आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ध्वनिप्रदूषणही नियंत्रणाबाहेर गेले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मनपाने २०१४-१५ चा पर्यावरण स्थिती अहवाल बुधवारी सर्वसाधारण सभेत सादर के ला. शहरातील जीवनमान निर्देशांक वाढला असला तरी ध्वनी व हवा प्रदूषणामध्येही वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयआयटी कानपूर यांच्याशी सल्लामसलत करून हवा गुणवत्ता निर्देशांक मोजणी केली आहे. या अहवालाप्रमाणे शहरातील हवा पीएम १० प्रदूषणाकरिता हवा गुणवत्ता ७० टक्के म्हणजेच धोकादायक व फार वाईट वर्गवारीमध्ये आढळून आली आहे. बहुतांश मोजमापन करण्यात आलेल्या नोंदी मध्यम व फार वाईट वर्गवारीमध्ये आढळून आल्या आहेत. तुर्भे व कोपरखैरणे परिसरामध्ये धूलिकणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हवेमुळे नागरिकांना हृदय, फुप्फुसे व श्वसनयंत्रणेशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढला आहे. दगडखाणी व इतर कारणामुळे हवा प्रदूषण वाढत आहे. महापालिकेने केलेल्या उपाययोजनाशहरातील १९ महत्त्वाच्या चौकांचे काँक्रीटीकरण, वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी ट्रॅफिक सिग्नल व टायमर्स बसविले आहेत.रबाळे, घणसोली, कोपरखैरणे व ऐरोलीमधील भुयारी मार्गाचे नूतनीकरण केले आहे. रोडच्या दोन्ही बाजूंना हिरवळ तयार केली आहे.पामबीचसह प्रमुख रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई. शहरामधील ध्वनी व हवा प्रदूषणाची स्थितीहवेमधील पीएम १० चे प्रमाण धोकादायक व फार वाईट वर्गवारीमध्ये आढळले.तुर्भे व कोपरखैरणे परिसरामध्ये धूलिकणांचे प्रमाण सर्वात जास्तनिवासी परिसरामध्ये ध्वनिप्रदूषणाचे दिवसाचे प्रमाण ६९ डेसिबलपर्यंत गेले आहे.निवासी परिसरात रात्रीचे ध्वनीचे प्रमाण ६०.२५ डेसिबलपर्यंत गेले आहे.शहरातील रहदारीच्या सातही ठिकाणी ध्वनिप्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे.सीबीडीमधील एक अपवाद वगळता सर्व शांतताक्षेत्रांमध्ये गोंगाट सुरु आहे.