शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे कर्करुग्णांचा त्रास होणार कमी; ३५० कोटी रुपयांची एक हजार टनांची यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 05:07 IST

विशेष म्हणजे, जगभरात सर्वत्र अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली ही उपचार पद्धती दक्षिण आशियामध्ये खारघर टाटा एक्ट्रेक्टच्या माध्यमातून प्रथमच वापरली जाणार आहे.

- वैभव गायकरपनवेल : खारघरमधील टाटा एक्ट्रेक्ट सेंटरमध्ये लवकरच कर्करुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार पद्धतीचा वापर केला जाणार आहे. प्रोटॉन थेरपी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याकरिता केला जाणार आहे. यामुळे कर्करुग्णांचा मोठ्या प्रमाणावर त्रास कमी होणार आहे. विशेष म्हणजे, जगभरात सर्वत्र अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली ही उपचार पद्धती दक्षिण आशियामध्ये खारघर टाटा एक्ट्रेक्टच्या माध्यमातून प्रथमच वापरली जाणार आहे.प्रोटोन थेरॅपी ही कर्करुग्णांना दिली जाणारी सर्वात महागडी अशी उपचार पद्धती आहे. कर्करुग्णांच्या पेशींना नष्ट करण्यासाठी रेडिएशन दिले जाते. परंपरागत चालत आलेल्या रेडिएशनचा उपचार पद्धतीत कर्करुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रोगी पेशींसह निरोगी पेशीदेखील यामुळे मृत पावत असल्याने घातक परिणाम कर्करुग्णांवर होतो. या वेळी अनेक रुग्णांचे केसदेखील गळत असतात. मात्र, नव्याने अवगत झालेल्या प्रोटॉन थेरपीमुळे रुग्णांना होणार त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सुमारे ३५० कोटी रुपयांची एका हजार टनांची ही यंत्रणा आहे. अमेरिकेत याच थेरपीसाठी किमान ७० लाख रुपये मोजावे लागतात. भारत सरकारच्या परमाणू ऊर्जा विभागाच्या मदतीने ही यंत्रणा खारघर टाटा रुग्णालयात उभारण्यात येत आहे. संबंधित यंत्रणा कार्यान्वित होण्यास अद्याप सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती खारघर टाटा एक्ट्रेक्ट सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी दिली.- या थेरपीमुळे कर्करुग्णांना होणारा केसगळती, अंगदुखीचा त्रास कमी होणार आहे. विशेष म्हणजे, रेडिएशनमुळे निरोगी पेशींना होणारी इजा यामुळे कमी होणार आहे.आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोफत स्वरूपात हे उपचार खारघर येथे दिले जाणार आहेत. दिवसभरात सुमारे ३० ते ४० रुग्णांना या ठिकाणी प्रोटॉन थेरपी दिली जाणार आहे. ६५०० चौरस फूट जागेमध्ये ही यंत्रणा ठेवली जाणार आहे.सुमारे ३५० कोटी रुपयांची एका हजार टनांची ही यंत्रणा आहे. अत्याधुनिक स्वरूपाची ही प्रोटॉन थेरपी आहे. देशात प्रथमच सरकारी रुग्णालयात ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. भारत सरकारच्या परमाणू ऊर्जा विभागाच्या मदतीने ही यंत्रणा खारघर टाटा रुग्णालयात उभारण्यात येत आहे. संबंधित यंत्रणा कार्यान्वित होण्यास अद्याप सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागेल.- सुदीप गुप्ता, संचालक, खारघर टाटा एक्ट्रेक्ट सेंटर

टॅग्स :cancerकर्करोग