शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर बीडीओकडे कोट्यवधींचे घबाड, नवीन पनवेलमध्ये ७२ लाखांचा फ्लॅट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 13:00 IST

पेण पंचायत समितीमध्ये कार्यरत असणारे तक्रारदार यांचा मुख्यालय, अलिबाग येथील बदलीचा अहवाल रायगड जिल्हा परिषद येथे पाठविण्यासाठी पेण पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एम.एन. गढरी यांच्याकडे दोन महिन्यांपूर्वी अर्ज केला होता.

वडखळ : पेण पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांचा  मुख्यालय बदलीचा अहवाल रायगड जिल्हा परिषदेत पाठविण्यासाठी १५ हजारांची लाच घेताना अटक केलेल्या पेण पंचायत समितीचे प्रभारी एम. एन. गढरी यांच्याकडे कोट्यवधींचे घबाड सापडले आहे. नवी मुंबई येथे ७२ लाख रुपये किमतीचा फ्लॅट तसेच १५० ग्रॅम सोनं सापडल्याची माहिती उघड झाली आहे.  पेण पंचायत समितीमध्ये कार्यरत असणारे तक्रारदार यांचा मुख्यालय, अलिबाग येथील बदलीचा अहवाल रायगड जिल्हा परिषद येथे पाठविण्यासाठी पेण पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एम.एन. गढरी यांच्याकडे दोन महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. या बदलीसाठी गढरी यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला वीस हजारांची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदार यांनी रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  २३ जूनला  पेण पंचायत समितीमध्ये सापळा रचत तक्रारदारांकडून १५ हजार रुपये रोख रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. गढरी याला चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारPoliceपोलिसpanvelपनवेल