शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याचा रात्रीस खेळ चाले, दिवसभर संकेतस्थळ हँग होत असल्याने गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 15:28 IST

रात्री बारानंतर होते प्रक्रिया सुरळीत : १५,५०० शेतकरी राहणार वंचित

अरुणकुमार मेहत्रे -कळंबोली : पनवेल  तालुक्यात पीक विमा काढण्याची लगबग सुरू आहे. एक रुपयात पीक विमा असला तरी पनवेल तालुक्यात त्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. जे शेतकरीपीक विमा भरतात, त्यांना ऑनलाइन संकेतस्थळ हँग होत असल्याने अडचणी येत आहेत. रात्री बारानंतर संकेतस्थळ सुरळीत सुरू राहत असल्याने पीक विम्याचा रात्रीस खेळ चाले असे चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यात नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान वाढत आहे. त्यात यंदा पेरणी व भातलावणी उशिराने झाली आहे. पाऊस जास्त प्रमाणात झाला आहे. दरवर्षी पीक विमा काढण्यासाठी विमा कंपन्यांना मोठी रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागत होती. मात्र, यंदा शासनाने पीक विमा रक्कम स्वत:भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना एक रुपया भरून तो काढता येणार आहे. पनवेल तालुक्यात जवळपास २० हजार शेतकरी आहेत. त्यापैकी शुक्रवारपर्यंत ४७१ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा काढायचा आहे, त्यांच्या अडचणी संकेतस्थळ सुरळीत चालत नसल्याने वाढल्या आहेत. पीक विमा भरण्यासाठी दोन दिवस राहिले असून, शासनाने मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी पीक विम्याला मुकणार असल्याचे चित्र सध्या पनवेल तालुक्यात निर्माण झाले आहे. 

आठ दिवसांपासून अडचण सुरू पीक विमा काढण्यासाठी अचानक संकेतस्थळावर लोड वाढला आहे. सातबारा प्रमाणिकरण न होणे किंवा ऑनलाइन संकेतस्थळ बंद होण्याच्या या अडचणी गत आठ दिवसांपासून सुरू आहेत. त्यामुळे एका केंद्रावर दिवसाला एक ते दोन शेतकऱ्यांचाच विमा काढला जातो आहे. 

२ दिवसांत काय होणार? पीक विमा काढण्यासाठी अंतिम मुदत ही ३१ जुलै आहे. परंतु, संकेतस्थळ स्लो झाल्याने विमा काढण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत ई- सेवा केंद्र चालकही हैराण झाले आहेत. आता अवघे दोन दिवस उरल्याने तो काढण्याची प्रक्रिया कशी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

गेली आठ दिवस पीक विमा भरण्यासाठी  संकेतस्थळाच्या अडचणी येत आहेत. रात्री बारानंतर संकेतस्थळ सुरळीत चालते आहे. दिवसभर चालत नसल्याने चार दिवस पीक विमा भरण्यासाठी अनेकदा चकरा माराव्या लागल्या आहेत. त्यात आता दोन दिवस उरल्याने अनेक शेतकरी पीक विमा भरू शकणार नाहीत. त्यांना सरकारने मुदतवाढ द्यावी.- राम पाटील, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाCropपीक