शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Crime: इंजिनीअरिंग कॉलेजच्या स्टेशनरीचे दहा लाख घेऊन चालक फरार, चावी गाडीत ठेवून काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 12:44 IST

Navin Panvel: काॅलेजचे प्राध्यापक हे चालकास गाडीत बसून राहण्यास सांगून  प्राचार्यांसोबत  जेवण करण्यासाठी गेले असता चालक संतोष केशव गिरी याने गाडीच्या डिक्कीतील दहा लाख रुपये घेऊन पलायन केल्याची घटना घडली.

 नवीन पनवेल :  अहमदनगर येथील इंजिनीअरिंग काॅलेजचे प्राध्यापक हे चालकास गाडीत बसून राहण्यास सांगून  प्राचार्यांसोबत  जेवण करण्यासाठी गेले असता चालक संतोष केशव गिरी याने गाडीच्या डिक्कीतील दहा लाख रुपये घेऊन पलायन केल्याची घटना घडली. याप्रकरणी कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिरुद्ध माणिक अडसूळ हे वाघमळा, अहमदनगर येथे राहत असून ते अडसूळ टेक्निकल कॅम्पस या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिक्षक आहेत. त्यांनी त्यांच्या स्कोडा गाडीवर संतोष गिरी (वय ४८) याला चालक म्हणून ठेवले. १३ एप्रिल रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास ते पुण्याला जाण्यासाठी निघाले. संध्याकाळी आठ वाजता तेथे पोहोचले. यावेळी संस्थेसाठी लागणारे बुक व जनरल घेण्यासाठी वेळ नसल्याने ते पुस्तके न घेता परत निघाले. यावेळी रात्री दहाच्या सुमारास कळंबोली येथील हॉटेल कॅप्टन अँड रेस्टॉरंट येथे जेवणासाठी गाडीतून खाली उतरले. यावेळी ड्रायव्हरला गाडीत बसून राहण्यास सांगून अनिरुद्ध, त्यांचा मुलगा व प्राचार्य पाटील हे जेवणासाठी आतमध्ये गेले. जेवण करून बाहेर आले असता गाडी ज्या ठिकाणी उभी केली होती त्या ठिकाणी ती दिसली नाही. गाडीचा त्यांनी शोध घेतला. गाडीच्या डिक्कीत सापडली बॅग बार समोरील रस्त्यावर ती उभी केलेली दिसली. मात्र, गाडीत ड्रायव्हर नव्हता. त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला असता त्याने गाडीमध्ये चावी ठेवली आहे, असे सांगून फोन कट केला. यावेळी गाडीची डिक्की खोलून बॅग पाहण्यास सांगितले असता डिक्कीत बॅग होती. मात्र, या बॅगेत ठेवलेले दहा लाख रुपये मिळून आले नाहीत. त्यामुळे संतोष केशव गिरी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी